‘एफडीए’विरोधात चार पानी अहवाल शासनाला सादर

By Admin | Updated: July 16, 2016 00:11 IST2016-07-16T00:11:12+5:302016-07-16T00:11:12+5:30

यामध्ये गुटख्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यांचे क्रमांक व पत्ते आढळून आले.

Presenting four water reports against the 'FDA' to the government | ‘एफडीए’विरोधात चार पानी अहवाल शासनाला सादर

‘एफडीए’विरोधात चार पानी अहवाल शासनाला सादर

अमरावती : यामध्ये गुटख्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यांचे क्रमांक व पत्ते आढळून आले. त्याआधारे पुन्हा पथकाने धाडसत्र राबविले. मात्र पथक पोहचण्यापूर्वीच येथून माल गायब करण्यात आला होता. या विक्रेत्याला महसूल पथकाने अन्न व औषधी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या स्वाधिन करण्यात आले असता त्यांनी या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यास नकार दिला असल्याचे तहसीलदार सुरेश बगळे यांनी सांगितले.
या कारवाईत दोन्ही तहसीलदारांसमवेत नायब तहसीलदार मुन्ना मावळे, नंदकिशोर मधापूरे, नरेंद्र कुरळकर, सदानंद सांगावे, अमोल जवळकर, प्रमोद क्षीरसागर, मळसने, भगत आदी उपस्थित होते.
अन्न व औषधी विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव तरी या विभागाचा कारभार ढिसाळ आहे. यामुळे एफडीए विरोधात चार पानांचा अहवाल शासनाला सादर केला आहे. व जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले ना.गिरीष बापट यांना देखील एफडीएच्या एकंदरीत कारभाराची माहिती दिली असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी लोकमतशी बोलतांना सांगीतले.
१९ मार्चच्या २०१६ शासन आदेशाद्वारे सर्व विभागाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने प्रदान केले आहे. त्या अनुषंगाने गुटखा विक्री व गोदामावर महसूल विभागाद्वारे कारवाई करण्यात येत आहे.व जोवर एफडीए सक्रिय होणार नाही तोवर महसूल विभागाच्या धाडसत्र सुरुच राहणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात अधिकृत १५३ गोदाम आहेत. मात्र अनधिकृत गोदाम ३०० चेवर आहे. यासाठी शहरातील गोदामांचे बाजार परवाने तपासनी करण्याविषयी महापालिकेला कळविण्यात आले आहे. बाजार परवान्याची तपासनी झाल्यास अनधिकृत गोदाम उघडकीस येतील व पर्यायाने महापालिकेच्या उत्पन्नात देखील भर पडेल असे गित्ते यांनी सांगितले.
अनेक गोदामाचे मालक हे गुटखा व्यापारीच असल्याचे उघड झाले आहे. जेवढा माल कारवाईत जप्त केला जातो तेवढाच माल त्या कंपनीद्वारा व्यापाऱ्याला कंपनीद्वारा मोफत मिळते त्यामुळे व्यापारी कारवाईला जुमानत नाही मात्र, महसूल विभागाचे धाडसत्र असेच सुरु राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

 

Web Title: Presenting four water reports against the 'FDA' to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.