शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

७२ टक्के बाधित पिकांचे केंद्रीय पथकासमोर सादरीकरण, १८०४ कोटींची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 18:29 IST

बुलडाणा, अकोला जिल्ह्यात जवळपास पूर्णत: नुकसान झाले आहे, तर अमरावती, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले.

अमरावती : विभागात १७ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे विभागातील सोयाबीन, कापूस, ज्वारी या प्रमुख पिकांसह भाजीपाला, हळदी आणि फळपिकांचे ७२ टक्के क्षेत्रात नुकसान झालेले आहे. या बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी गुरुवारी कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी. सिंह दाखल झाले. तीन दिवस त्यांचा दौरा राहणार आहे. या अनुषंगाने आढावा बैठकीत शासन निकषानुसार १८०४ कोटींंच्या मदतीची आवश्यकता असल्याचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी सांगितले.

या बैठकीला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त गजेंद्र बावणे, संजय पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे आदी उपस्थित होते. विभागात खरीप हंगामातील लागवडीखालील ३१ लाख १८ हजार ७९७ हेक्टर क्षेत्रापैकी २२ लाख ४४ हजार ४३६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. विभागात सर्वाधिक सुमारे ९१ टक्के नुकसान सोयाबीनचे झाले आहे.

बुलडाणा, अकोला जिल्ह्यात जवळपास पूर्णत: नुकसान झाले आहे, तर अमरावती, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. ज्वारीचे ८४ टक्के व बुलडाणा, अकोला जिल्ह्यात कापसाचे जवळपास संपूर्णत: नुकसान झाले आहे. विभागात ४०३२ हेक्टर संत्रा, ४,४६४ हेक्टर इतर फळपिके असे एकूण ८,४९७ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिली. या बैठकीनंतर पथक विभागातील पाहणीसाठी रवाना झाले.

पथक आज अकोला, बुलडाणा जिल्ह्यातकेंद्रीय पथकाचे सदस्य शनिवारी अकोला तालुक्यात म्हैसपूर, कापसी तलाव, गोरेगाव खुर्द व दुपारी बाळापूर तालुक्यात भारतपूर, नकाशी, वाडेगाव, कासारखेडा खामगाव तालुक्यात कोलोरी, टेंभुर्णी सुटाळा व रविवारी चिखली तालुक्यात केलवळ, हातणी, आमखेड व व मेहकर तालुक्यात महागाव, बाळखेड  व वाशीम तालुक्यात नागठाणा व वांगी येथील बाधित शेतीपिकांची पाहणी करणार आहेत. शुक्रवारी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील दाभा, जळू, जसापूर, माहुली चोर, व यवतमाळ जिल्ह्यातील वटफळी, नेर, मोझर, घारेफळ, सातेफळ या गावांतील बाधित पिकांची पाहणी केली.

टॅग्स :Amravatiअमरावती