अतिक्रमणासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार
By Admin | Updated: November 1, 2014 22:44 IST2014-11-01T22:44:26+5:302014-11-01T22:44:26+5:30
शहरातील अतिक्रमण आणि अवैध होर्डिग्ज विरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून उच्च

अतिक्रमणासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार
अमरावती : शहरातील अतिक्रमण आणि अवैध होर्डिग्ज विरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाणार आहे.
येथील पोलीस आयुक्तालयात दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त सुरेश मेकला, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांच्या हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी मोकाट जनावरे तसेच वराह यांचाही त्रास कसा कमी करता येईल, याबाबत मंथन करण्यात आले. अवैध होर्डिग्ज, अतिक्रमण, मोकाट वराह आदी बाबींविषयी कारवाई करताना विशिष्ट समुहाच्या रोषाला सामारे जावे लागते. अनेकदा महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले देखील झाल्याची बाब यावेळी आयुक्त अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केली. पोलीस बंदोबस्त मिळाल्यास अवैध होर्डिग्ज, अतिक्रमण किंवा मोकाट जनावरांची कारवाई करणे सुलभ होईल, असेही ते म्हणाले. वाहतूक व्यवस्थेला महापालिका जबाबदार असून महत्वाच्या ठिकाणी आॅटो स्टॅड निर्माण करण्याचे ठरविण्यात आले. बसस्थानक परिसरात विस्कळीत वाहतूक सुधारण्यासाठी नव्याने आॅटो स्टॅन्ड तयार केले जाणार आहे. मिनी आॅटो स्टॅडच्या माध्यमातून आॅटोरिक्षा व्यवस्थित उभे राहतील व बसस्थानक परिसरात वाहतूक विस्कळीत होणार नाही, याची काळजी देखील महापालिका व पोलीस प्रशासनाने या बैठकीत घेतली आहे.