अमरावतीच्या प्रीती देशमुख हिची ऑलिम्पिक संघात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:14+5:302021-01-19T04:16:14+5:30
शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी, २०२४ मध्ये पॅरिस येथे आयोजन, महाराष्ट्रातून एकमेव वेटलिफ्टर (फोटो - १८एएमपीएच०८) अमरावती : पॅरिसमध्ये सन- ...

अमरावतीच्या प्रीती देशमुख हिची ऑलिम्पिक संघात निवड
शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी, २०२४ मध्ये पॅरिस येथे आयोजन, महाराष्ट्रातून एकमेव
वेटलिफ्टर (फोटो - १८एएमपीएच०८)
अमरावती : पॅरिसमध्ये सन- २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती प्रमोद देशमुख हिची भारत्तोलन (वेटलिफ्टिंग) संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय संघात निवड होणारी ती राज्यातील एकमेव खेळाडू आहे,
प्रीती ही श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात बी.एस्सी. प्रथम वर्षात प्रवेशित आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील प्रीतीने इयत्ता अकरावीपासूनच खेळाकडे लक्ष केंद्रित केले. बारावीला असताना ‘खेलो इंडिया’मध्ये तिने पदक पटकावले. भारताचा वेटलिफ्टिंग संघ २५ खेळाडूंचा आहे. या संघात ८५ किलो वजनगटात समावेश झालेल्या प्रीतीचे नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट (पतियाळा) येथे प्रशिक्षण सुरू झाले आहे. तिच्या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तिचे व कुटुंबाचे कौतुक केले. प्राचार्य वि.गो. ठाकरे यांनी प्रीतीच्या पतियाळा येथील प्रशिक्षकांशी संपर्क साधून महाविद्यालयाच्यावतीने तिला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणीने प्रीती हिच्या यशाबद्दल कौतुक होत आहे.
------------------
प्रीती ही डिसेंबर २०२० पासून प्रशिक्षणास गेली. २५ खेळाडूंमध्ये तिची निवड झाली, असे प्रशिक्षक बलविंदरसिंग यांनी सांगितले. पुढील चार वर्षे ती तयारी करणार असून, २०२४ मध्ये थेट स्पर्धेत सहभागी
होईल.
- वि.गो. ठाकरे, प्राचार्य, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती