गर्भवती महिलांना आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:42+5:302021-07-07T04:15:42+5:30
अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आता लसीकरण मोहिमेला गती आलेली आहे. नागरिकांचा प्रतिसाददेखील मिळत आहे. ...

गर्भवती महिलांना आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस
अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आता लसीकरण मोहिमेला गती आलेली आहे. नागरिकांचा प्रतिसाददेखील मिळत आहे. यात आता गर्भवती महिलांनादेखील कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली व या सात महिन्यांच्या कालावधीत गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येत नव्हती. आता याविषयीच्या चाचण्या झाल्यामुळे गर्भवती महिलांना ही लस घेता येणार आहे. या महिलांना कुठलाही आजार असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. याविषयी आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी व्हिसीद्वारे मार्गदर्शन केले आहे. यामुळे गर्भवती महिलेचा कोरोना संक्रमणाचा धोका कमी होणार आहे. मात्र, लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
यापूर्वी मासिक पाळी दरम्यान लस घेता येते की, नाही याविषयी संभ्रम होता, मात्र, रोग प्रतिकारशक्तीशी याचा कुठलाही संबंध नसल्याचे आरोग्य विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. स्तनदा मातांना यापूर्वीच लसीकरणाची परवानगी देण्यात आल्यानंतर आता हा मोठा निर्णय असल्याचे मानले जात आहे.
बॉक्स
गर्भवती महिलांनी ही घ्यावी काळजी
* लस घेण्यापूर्वी भरपूर नाष्टा किंवा जेवण करावे
* लसीकरणानंतर कुठेलेही लक्षण दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन महत्त्वाचे आहे.
* ३५ वर्षांवरील महिलांनी लस घेतेवेळी सहव्याधीची कल्पना डॉक्टरांना द्यावी.
* लसीकरणापूर्वी स्त्री रोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
कोट
लसीकरणामुळे गर्भवती महिलांचे कोरोनापासून संरक्षण होईल. मात्र, प्रकृती ठिक नसल्यास त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच लस घ्यावी.
- डॉ. विशाल काळे,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी
कोट
लसीकरणामुळे बाळ व आईचे कोरोना संसर्गापासून संरक्षण होईल व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे.
- डाॅ श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक
पाईंटर
आतापर्यंत लसीकरण : ६,१७,०४५
पहिला डोस : ४,६४,२०१
दुसरा डोस : १,५२,८४४
प्राप्त डोस : ६,२०,४४०