लग्न ठरलेल्या गर्भवती तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:31 IST2019-04-08T23:30:29+5:302019-04-08T23:31:20+5:30
प्रेमप्रकरणातून गर्भवती झाली आणि त्यातच कुटुंबीयांनी लग्न ठरविले. गुपित उघड झाल्यास बदनामी होईल, या भीतीने एप्रिल महिन्याच्या शेवटी ठरलेल्या लग्नापूर्वीच तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री ही घटना कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गंभीर स्थितीत सदर तरुणीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी कुºहा पोलिसांनी तरुणीचे बयाण नोंदविले.

लग्न ठरलेल्या गर्भवती तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रेमप्रकरणातून गर्भवती झाली आणि त्यातच कुटुंबीयांनी लग्न ठरविले. गुपित उघड झाल्यास बदनामी होईल, या भीतीने एप्रिल महिन्याच्या शेवटी ठरलेल्या लग्नापूर्वीच तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री ही घटना कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गंभीर स्थितीत सदर तरुणीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी कुºहा पोलिसांनी तरुणीचे बयाण नोंदविले.
कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एक २४ वर्षीय तरुणीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसुत जुळले होते. प्रेमसंबधातून दोघांनी शारीरिक संबध प्रस्थापित केले. त्यातून ती तरुणी गर्भवती झाली. ही माहिती तिने कुटुंबीयांपासून लपविली होती.
दरम्यान, कुटुंबीयांनी लग्नासाठी मुलगा पाहण्यास सुरुवात केली. परिसरातीलच एका मुलाशी लग्न ठरले. एप्रिल महिन्याच्या शेवटी मुहूर्त निघाला. इकडे मात्र तरुणीची घालमेल वाढली होती. काय करावे अन काय नाही, अशा मनस्थितीत त्या तरुणीने अखेर टोकाचा निर्णय घेतला. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तिने विष प्राशन केले. हे लक्षात येताच कुटुंबीयांना तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तिची प्रकृती गंभीर होती. या घटनेची माहिती इर्विन पोलीस चौकीतून कुºहा पोलिसांना देण्यात आली.
कुºहा पोलिसांचे पथक रात्री १० वाजता इर्विनला पोहोचले. त्यांनी तरुणीचे बयाण घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, ती बयाण देण्यास असमर्थ होती. त्यामुळे सोमवारी कुºहा पोलीस पुन्हा बयाण घेण्यासाठी पोहोचले. त्या तरुणीने पोलिसांना बयाण दिल्यावर हा सर्व प्रकार उघड आला. ती मुलगी गर्भवती असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत पीडित मुलीने कोणाविरुद्ध तक्रार दिलेली नाही.
प्रेमप्रकरणातून गर्भवती झालेल्या मुलीचे लग्न ठरले आहे. तिने मानसिक तणावात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाइकांची चौकशी व मुलीने तक्रार दिल्यास कारवाईची पुढील दिशा ठरेल.
- सचिन जाधव, पोलीस निरीक्षक, कुºहा ठाणे