सामान्यांच्या कामांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2016 00:27 IST2016-10-05T00:27:25+5:302016-10-05T00:27:25+5:30

दिवसेंदिवस प्रशासकीय कामे वेगाने होणे गरजेचे असताना प्रशासनाची कासवगती कायम आहे़...

Prefer the work of the masses | सामान्यांच्या कामांना प्राधान्य द्या

सामान्यांच्या कामांना प्राधान्य द्या

वीरेंद्र जगताप : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश
धामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस प्रशासकीय कामे वेगाने होणे गरजेचे असताना प्रशासनाची कासवगती कायम आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही़ सामान्यांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने प्राधान्य देण्याचे निर्देश आढावा बैठकीत आ़ वीरेंद्र जगताप यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत़
स्थानिक पंचायत समितीच्या भवनात तालुकास्तरीय समित्यांची बैठक आ़वीरेंद्र जगताप यांनी घेतली़ प्रशासनाच्या कामाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक प्रकरणे एकाच ठिकाणी प्रलंबित पडून असल्याचे निदर्शनास येत आहे़ कर्मचाऱ्यांनी आपली सेवा योग्य रीतीने बजावली तर सर्व सामान्यांना आपोआप न्याय मिळते़ आपले कर्तव्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी न विसरता दररोज किमान आपल्या टेबलवरील चार फाईल पुढे पाठविल्या तरच गतिमान प्रशासन दिसेल. मात्र शासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे़ आपल्या मतदारसंघातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामान्यांचे प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, असे निर्देश दिले़
या बैठकीत जलयुक्त शिवार अंतर्गत सुरू असलेली कामे, स्वस्त धान्य दुकानासंदर्भातील तक्रारी शेतात वीजपुरवठा किती काळात दिला जातो़ भारनियमन यासंदर्भातील आढावा घेण्यात आला़ आढावा बैठकीला जि़प़अध्यक्ष सतीश उईके, जि़प़ सदस्य मोहन सिंघवी, रंजना उईके, मोहन घुसळीकर, समन्वय समितीचे सुनील थूल, संजय तायडे, शिवा शिंदे, विजया इंगोले, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या साधना ढाणके, भानुदास ढगे, रमेश पुनसे, नरेंद्र पाचबुद्धे संजय सावंत, संजय गोठाणे, अब्दुल सलिम, अब्दुल हमीद, प़ंस़ सभापती गणेश राजनकर, गटविकास अधिकारी पंकज भोयर,पं़स़सदस्य सचिन पाटील, पं़स़ सदस्या संगीता निमकर, सविता इंगळे, प्रिती ढोबळे, तर जि़ल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर साकुरे, धाबर्डे, वीज मंडळाचे फडवणीस, वन विभागाचे एऩआऱ गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी शेंडे, ऩप़ चे मुख्याधिकारी सुरेश टाकरखेडे, भूमिअभिलेख उपअधीक्षक वळवी, यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Prefer the work of the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.