पावसासाठी सर्वधर्मीयांची प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:42 IST2017-08-11T23:42:17+5:302017-08-11T23:42:53+5:30
येथे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सर्वपक्षीय सर्वधर्मीयांनी वरुणराजाला साकडे घालीत पावसासाठी प्रार्थना केली.

पावसासाठी सर्वधर्मीयांची प्रार्थना
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : येथे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सर्वपक्षीय सर्वधर्मीयांनी वरुणराजाला साकडे घालीत पावसासाठी प्रार्थना केली.
पर्यटन स्थळावर कधी नव्हे, एवढी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे विदारक चित्र आहे. परिणामी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन गावकºयांच्यावतीने करण्यात आले होते. विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ असताना येथे पिण्याच्या पाण्यासाठी साठवण तलावाला बुड लागले आहे. दोन्ही तलावात जलसाठा उपलब्ध नसल्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई पाहता सर्वपक्षीयांनी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन शुक्रवारी प्रमुख चौकात केले होते. मो.जकीर मौलाना, धम्ममित्र कृष्णराव वानखडे, फादर गॅब्रीएल, पंडित मुकूंद सालफळ यांनी आपापल्या धर्मातील प्रार्थना म्हणत देवाला साकडे घातले. चांगले आचार, विचार, कृती, समतेचा, बंधुत्वाचा संदेश देत जातीय सलोखा बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदार प्रदीप पवार, बीडीओ ए.एन.अलोने, मुख्याधिकारी प्रशांत पवार, मो.हाजी अशरफ, टिल्लू तिवारी, विन्सेट चन्दानी, सेमुएल डेनीयल आदी उपस्थित होते.