प्रवीण पोटे यांचे धामणगावात स्वागत

By Admin | Updated: December 6, 2014 22:39 IST2014-12-06T22:39:11+5:302014-12-06T22:39:11+5:30

भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये शपथ घेतलेले उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी धामणगाव येथे येवून भाजपाचे नेते अरूण अडसड यांचे आर्शिवाद घेतले.

Praveen Pote welcomes welcome | प्रवीण पोटे यांचे धामणगावात स्वागत

प्रवीण पोटे यांचे धामणगावात स्वागत

धामणगाव रेल्वे : भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये शपथ घेतलेले उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी धामणगाव येथे येवून भाजपाचे नेते अरूण अडसड यांचे आर्शिवाद घेतले.
राज्यमंत्री मंडळाचा विस्तार काल झाला यात अमरावती जिल्ह्यातून विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे यांना मंत्री मंडळात सामावून घेण्यात आले. शुक्रवारला शपथविधी आटोपल्यानंतर शनिवारी मुंबईवरून ते शेगाव येथे संत गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आले. तेथून थेट धामणगाव गाठून भाजप नेते अरूण अडसड यांच्या निवासस्थानी आले व स्वत:च्या लाल दिव्याच्या गाडीत अडसड यांना घेवून अमरावती येथील विजयी रॅलीसाठी रवाना झाले.
अडसड यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड, अनिल राठी, न.प.उपाध्यक्ष हेमकरण कांकरीया, नगरपरिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. अरूण अडसड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यात विकासात्मक कामे करणार असल्याचे पोटे यांनी आपले मत व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Praveen Pote welcomes welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.