कैद्यांच्या कलाकृतीची पालकमंत्र्यांकडून स्तुती

By Admin | Updated: September 5, 2016 00:18 IST2016-09-05T00:18:15+5:302016-09-05T00:18:15+5:30

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी येथील मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने स्थानिक नेहरू मैदानावर विविध साहित्य, वस्तू विक्रीचे स्टॉल लावले आहे.

Praise from captives of prisoners' artwork | कैद्यांच्या कलाकृतीची पालकमंत्र्यांकडून स्तुती

कैद्यांच्या कलाकृतीची पालकमंत्र्यांकडून स्तुती

स्टॉलला भेट : ईको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी साहित्य विक्री
अमरावती : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी येथील मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने स्थानिक नेहरू मैदानावर विविध साहित्य, वस्तू विक्रीचे स्टॉल लावले आहे. रविवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या स्टॉलला भेट देऊन कैद्यांनी साकारलेल्या कलाकृतीची स्तुती केली. यावेळी ना.पोटे यांचे कैदी बांधवांनी पुष्पगुच्छांनी स्वागत केले.
गणेशोत्सवासाठी लागणारे लाकडी पाट, दिवे, पूजेचे साहित्य आदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नेहरु मैदानावर लागलेल्या स्टॉलला रविवारी पालकमंत्री पोटे यांनी भेट देऊन कैद्यांनी साकारलेल्या वस्तुंची पाहणी केली. ज्या हाताला गुहेगारीचा कलंक लागला आहे ते हात आता कलाकुसर साकारूलागल्याने त्यांची कलाकृती बघून पालकमंत्री अवाक् झालेत. पाषाण भिंतीच्या आत शिक्षा भोगत असताना कैदी सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत सुंदर आणि सुरेख कलाकुसर साकारू शकतात, हे स्पष्ट झाले. यावेळी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी ना. पोटे यांना कारागृहातील कामकाजाची माहिती दिली. कारागृहातील कैद्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी ना. पोटे यांच्या पुढ्यात ठेवण्यात आली. दरम्यान कारखाना व्यवस्थापक तुरुंगाधिकारी माया धतुरे, हवालदार गजानन क्षीरसागर, सुभेदार विक्रम तिवस्कर, धर्मपाल शेंद्रे, संग्राम नेवसे आदींनी पालकमंत्र्यांना कारागृहातील कारखान्यात होणाऱ्या कामकाजांची माहिती दिली.

पालकमंत्र्यांनी खरेदी केली आरामखुर्ची, टी ट्रे
कैद्यांनी साकारलेल्या वस्तू, साहित्य बघून पालकमंत्र्यांनादेखील साहित्य खरेदी करण्याचा मोह आवरला नाही. नेहरू मैदानात स्टॉलवर विक्रीसाठी असलेल्या साहित्यापैकी पालकमंत्र्यांनी सागवान लाकूडनिर्मित आरामखुर्ची व टी ट्रे खरेदी खरेदी करून कैद्यांना प्रोत्साहित केले, हे विशेष.

Web Title: Praise from captives of prisoners' artwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.