पीडीएमसीला उत्कृष्ट ‘आयसीटीसी’ पुुरस्कार
By Admin | Updated: December 22, 2015 00:14 IST2015-12-22T00:14:38+5:302015-12-22T00:14:38+5:30
जागतिक एड्स सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधितांमध्ये जनजागृती करणाऱ्या व्यक्ति, संस्थांचा पुढाकार सन्मान सोहळा...

पीडीएमसीला उत्कृष्ट ‘आयसीटीसी’ पुुरस्कार
सन्मान सोहळा : एड्स जनजागृतीत जिल्हा अव्वल
अमरावती : जागतिक एड्स सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधितांमध्ये जनजागृती करणाऱ्या व्यक्ति, संस्थांचा पुढाकार सन्मान सोहळा स्थानिक टाऊन हॉल येथे शनिवारी आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात एड्ससाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आयसीटीसी केंद्रांना दिला जाणारा प्रथम जिल्हास्तरीय पुरस्कार यंदा डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला.
प्रत्येक तालुका स्तरावर ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हा स्त्री रूग्णालय व डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांची एचआयव्ही तपासणी मोफत करता यावी, याकरिता महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबईने जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालय, जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माध्यमातून एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (आयसीटीसी) सुरू करण्यात आले आहे.
पुरस्कार सोहळ्यात जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत, जिल्हा क्षयरोग रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक दिलीप देशमुख, एड्स नियंत्रण कार्यालयाचे प्रकाश शेगोकार व संबंधित अधिकारी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना, प्रदीप भाकरेंसह, सर्व आयसीटीसी, ब्लड बँक, एसटीडी, एआरटीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)