प्रबोधन विद्यालयाच्या कार्यालयाला भीषण
By Admin | Updated: June 7, 2017 12:07 IST2017-06-07T12:07:42+5:302017-06-07T12:07:42+5:30
येथील प्रबोधन विद्यालयाच्या कार्यालयाला आग लागल्याची मंगळवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. विद्यालयातील कागदपत्रे व रेकॉर्ड

प्रबोधन विद्यालयाच्या कार्यालयाला भीषण
>ऑनलाइन लोकमत
दर्यापूर, दि. 06 - येथील प्रबोधन विद्यालयाच्या कार्यालयाला आग लागल्याची मंगळवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. विद्यालयातील कागदपत्रे व रेकॉर्ड जळाले असून सुमारे तीन लाख रुपयांचा साहित्य जळाले. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, मूर्तीजापूर मार्गावर असलेले प्रबोधन विद्यालयात मंगळवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजताच्या दरम्यान आग लागल्याची माहिती येथील रात्रपाळीतील शिपायाला मिळाली. त्यांने आसपासच्या लोकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही लोकांनी आगीची माहिती पोलिसांना व अग्नीशमन विभागाला दिली. अग्नीशमन दलाच्या दोन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत कार्यालयातील झेरॉक्स मशीन, दोन कॉम्प्युटर व इतर महत्त्वाचे दस्तऐवज (रेकॉर्ड) जळून खाक झाले.
मुख्याध्यापिका मेघा धर्माधिकारी यांना माहिती मिळताच त्या शाळेत हजर झाल्या. दर्यापूरचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली. सकाळी आग लागल्याची बातमी वा-यासारखी शहरात पोहचल्याने बघ्यांची गर्दी जमली होती. अनेक विद्यार्थ्यांचे या शाळेशी जिव्हाळ्याचे संबध असल्याने शहरात या घटनेची चांगलीच चर्चा झाली होती. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.