‘पॉवर आॅफ अटर्नी’च्या नोटरीचे उतारे जप्त‘पॉवर आॅफ अटर्नी’च्या नोटरीचे उतारे जप्त
By Admin | Updated: May 24, 2017 00:02 IST2017-05-24T00:02:17+5:302017-05-24T00:02:17+5:30
महापालिकेतील नाहरकत प्रमाणपत्रात छेडछाड केल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी ‘पॉवर आॅफ अटर्नीं’च्या नोटरी नोंदणीचे उतारे जप्त केलेत.

‘पॉवर आॅफ अटर्नी’च्या नोटरीचे उतारे जप्त‘पॉवर आॅफ अटर्नी’च्या नोटरीचे उतारे जप्त
वकील राठींचे बयाण नोंदविले : नाहरकत प्रमाणपत्रातील छेडछाडीचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेतील नाहरकत प्रमाणपत्रात छेडछाड केल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी ‘पॉवर आॅफ अटर्नीं’च्या नोटरी नोंदणीचे उतारे जप्त केलेत. सोबतच नोटरी करणारे वकील मधू राठी यांचे बयाण नोंदवून त्यांची चौकशी केली.
नाहरकत प्रमाणपत्रावर हुक्का पार्लरसह चार मनोरंजन व्यवसायांची नावे लिहिणाऱ्या नवीनचंद्र भंडारी व अमित दुबे यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकेसह व्यापारी जगतात खळबळ उडाली. भंडारी व दुबे हे नाहरकत प्रमाणपत्रावर हुक्का पार्लरचे नाव नमूद करताना ‘सीसीटीव्ही’त कैद झाले आहेत. यावेळी ‘एडीटीपी’ विभागातील कर्मचाऱ्यांची वागणूक संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. नवीनचंद्र भंडारीने त्यांचा भाऊ घनश्याम भंडारीने दिलेल्या ‘पॉवर आॅफ अटर्नी’च्या माध्यमातून घनश्याम नावानेच नाहरकत प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या केल्याचेही चौकशीत उघड झाले. यासंबधाने पोलिसांनी घनश्याम भंडारीला परभणीवरून बोलावून त्यांचे बयाण नोंदविले. दुसऱ्या दिवशी घनश्याम भंडारीला हस्ताक्षरांचे नमुने घेण्यासाठी बोलाविले होते. मात्र, ते हजर झाले नाहीत. दरम्यान पोलिसांनी ‘पॉवर आॅफ अटर्नी’ची नोटरी करणारे वकील मधू राठी यांचे बयाण सोमवारी नोंदविले. त्यांची चौकशी करून नोंदणीचे उतारे सुध्दा पोलिसांनी जप्त केले आहेत. आता पोलीस घनश्याम भंडारी उपस्थित राहण्याची पुन्हा प्रतीक्षा करीत आहेत. त्याच्या हस्ताक्षरांचे नमुने घेऊन त्यांची हस्ताक्षरतज्ज्ञांद्वारे तपासणी केली जाणार आहे. घनश्याम भंडारी यांनी ठाण्यात उपस्थित राहण्यास टाळाटाळ केल्यास पोलीस परभणी जाण्याची शक्यता आहे.
नवीनचंद्र, दुबेला जामीन मिळाल्याची चर्चा
नवीनचंद्र भंडारी व अमित दुबे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर त्यांना जामीन मिळाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी अद्याप न्यायालयात "से"दाखल केला नसल्याने आरोपींना जामीन मिळाला कसा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.