कुंभारांचा माती व्यवसाय संकटात

By Admin | Updated: August 26, 2015 00:04 IST2015-08-26T00:04:13+5:302015-08-26T00:04:13+5:30

दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान घरोघरी गणपतीची स्थापना केली जाते. यामध्ये कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होते.

Pottery soil in the business crisis | कुंभारांचा माती व्यवसाय संकटात

कुंभारांचा माती व्यवसाय संकटात

शासनाचे दुुर्लक्ष : मातीच्या गणपती निर्मितीकडे मूर्तिकारांची पाठ
लोकमत विशेष
मोहन राऊत  अमरावती
दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान घरोघरी गणपतीची स्थापना केली जाते. यामध्ये कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होते. परंतु मूर्ती खरेदी करताना आकर्षक व वजनाने हलक्या अशा प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींना पसंती दिली जाते. यामुळे विदर्भातील कुंभारांनी आता या व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे़ शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे त्यांचा हा व्यवसाय संकटात आला आहे़ एकीकडे अनेक सामाजिक संघटना प्रदूषण, विरहीत गणेशोत्सव उत्सव साजरा करण्याचे आवाहन करते़ दुसरीकडे ग्राहकच मातीच्या गणपती मुर्त्या घेण्याकडे पसंती दाखवीत नसल्याने प्रदूषण दूर करण्यास कसा हातभार लागणार, असा सवाल निर्माण होत आहे़
आगामी सप्टेंबर महिन्यात १७ तारखेपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार असल्याने सर्वच शहरात गणपती मूर्त्या तयार करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू आहे़ पण कुंभार समाजाची अवस्था बिकट आहे़
जन्माला आल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत मातीशी नाळ जुळलेल्या कुंभार समाजाला आपल्या न्याय्य हक्काच्या मागणीसाठी तीन दशकांपासून शासनाशी संघर्ष करावे लागत आहे. मात्र अख्खा जन्म मातीत घातल्यानंतरही शेवटच्या वृध्दापकाळात शासन आधार देत नसल्यामुळे विदर्भातील कुंभार समाजातील युवकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे यंदा प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणपती मूर्ती मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीकरिता येणार आहेत़ त्यामुळे मातीच्या गणपतींची मूर्ती आता दुर्मिळ झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्लास्टर आॅफ पॅरिसने केला घात
बारा बलुतेदारांपैकी कुंभार या समाजाचे या समाज घटकात मोलाचे स्थान आहे़ पूर्वी गावात कुंभारांनी बनविलेले भांडे ग्रामस्थ विकत घेऊन त्यामोबदल्यात धान्य देत असत. याच धान्यावर कुंभाराच्या घरची चूल पेटत होती़ विवाहाच्या वेळी कुंभाराच्या घरची मडकी आणण्याची प्रथा आजही कायम आहे़ दिवसेंदिवस वाढत्या गरजा व आधुनिकतेमध्ये माणसाच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत़ मातीच्या वस्तुच्या जागी आता प्लास्टिक व स्टिलची भांडी आल्याने कुंभार समाज आर्थिक संकटात सापडला आहे़ या समाजावर दुसरे आलेले संकट म्हणजे पूर्वी मातीच्या मूर्तीचा मान मोठ्या प्रमाणात होता़ मातीच्या ठिकाणी प्लास्टिक आॅफ पॅरिस आले. गणपती, दुर्गा देवी यांच्या मूर्ती बाजारात प्लास्टिक आॅफ पॅरिसच्या कमी किमतीत दरवर्षी मिळत असल्याने शहरात रस्त्याच्या कडेला दुकान लावलेल्या या कुंभाराच्या साहित्याची विक्रीच होत नसल्याचे उघड्या डोळ्यांनी सर्वसामान्य माणसाला पहावयास मिळते़ शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ही अवकळा आली आहे़
कुंभार समाजाकडे शासनाचे दुर्लक्ष
कुंभार व्यवसायाला लागणारे खुरपे, पाटी, फावडे, शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून या समाजाची आहे़ राजकीय नेतृत्व व संघटनशक्तीचा अभाव असल्याने या समाजाच्या मोजक्या मागण्यांकडे कुणीही लक्ष देत नाहीत़ शहरी भागात प्रदूषणाचा प्रादुर्भाव होतो. म्हणून कुंभारांंनी बनविलेल्या साहित्याच्या पेटत्या भट्ट्या विझवून अन्याय करण्याचे काम जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील नगरपरिषद, महानगरपालिका करीत असल्याने आधीच उपासमारीची पाळी आलेल्या कुंभारांनी न्याय मागायचा तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने अद्यापही आमच्या समाजाला विमुक्त भटक्या जमातीच्या सवलती न दिल्यामुळे ओबीसीच्या गटात आमचा टिकाव लागत नाही़ शासनही सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करीत नाही़ त्यामुळे समाजातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे़ किती दिवस मातीत जन्म घालायचा ़ पारंपारीक व्यवसायाकडे शासनाच्या दुर्लक्षित पणामुळे पाठ फिरविली जाते़ आज युवकांनी पारंपरिक व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला.
- राजेंद्र बढेरे,
अध्यक्ष,कुंभार संघटना..

Web Title: Pottery soil in the business crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.