कुंभार बांधवांवर आली उपासमारीची पाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST2021-03-28T04:12:43+5:302021-03-28T04:12:43+5:30
धामणगाव रेल्वे : जन्माला आल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत मातीशी नाळ जुळलेल्या कुंभार समाजाला आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी तीन तपांपासून शासनाशी ...

कुंभार बांधवांवर आली उपासमारीची पाळी
धामणगाव रेल्वे : जन्माला आल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत मातीशी नाळ जुळलेल्या कुंभार समाजाला आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी तीन तपांपासून शासनाशी संघर्ष करावा लागत आहे. उभा जन्म मातीत घातल्यानंतर वृद्धापकाळात शासन आधार देत नसल्यामुळे विदर्भातील कुंभार समाजावर उपासमारीची पाळी आली आहे.
बारा बलुतेदारांपैकी कुंभार समाजाचे या समाजघटकात मोलाचे स्थान आहे़ पूर्वी गावात कुंभारांनी बनविलेले भांडे ग्रामस्थ विकत घेऊन त्याच्या मोबदल्यात धान्य देत असत. याच धान्यावर कुंभाराची चूल पेटत होती़ विवाहाच्या वेळी कुंभाराच्या घरची मडकी आणण्याची प्रथा आजही कायम आहे़ दिवसेंदिवस वाढत्या गरजा व आधुनिकतेमुळे माणसाच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत़ मातीच्या वस्तूंच्या जागी आता प्लास्टिक व स्टीलची भांडी आल्याने कुंभार समाज आर्थिक संकटात अडकला आहे़ या समाजावर दुसरे आलेले संकट म्हणजे, पूर्वी मातीच्या मूर्तीचा मान होता़ आता मातीच्या ठिकाणी प्लास्टिक ऑफ पॅरीस आले. पीओपीच्या मूर्ती कमी किमतीत मिळत असल्याने शहरात रस्त्याच्या काठाला दुकान लावलेल्या कुंभाराच्या साहित्याची विक्रीच होत नाही. फ्रीजमुळे माठांची मागणी कमी झाली आहे. कुंभार व्यवसायाला लागणारे खुरपे, पाटी, पावडे, शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी अनेक दिवसांपासून मागणी या समाजाची आहे़