राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पोस्टपोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:28+5:302021-04-10T04:13:28+5:30
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवार, ११ एप्रिल रोजी होऊ घातलेली दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा- ...

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पोस्टपोन
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवार, ११ एप्रिल रोजी होऊ घातलेली दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२० कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. परिस्थितीनुसार ही परीक्षा पुढे घेण्यात येणार असून, सुधारित तारीख जाहीर केली जाईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने शुक्रवारी पत्राद्धारे कळविले आहे.
एमपीएससी परीक्षेसाठी रविवारी अमरावती शहरातील ४८ शाळा, महाविद्यालयांत नियोजन करण्यात आले होते. परीक्षार्थींना हॉल तिकीट पोहोचले होते. अमरावती विभागातून या परीक्षेसाठी १४,५४४ उमेदवारांनी नोंदणी केली. रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या दरम्यान एकाच सत्रात परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. या परीक्षेच्या नियोजनासाठी १२ समन्वय अधिकारी, दोन भरारी पथक प्रमुख, ४८ केंद्रप्रमुख, १८७ पर्यवेक्षक, ६८० समवेक्षक, ९६ लिपिक व ९६ शिपाई नियुक्त करण्यात आले होते. उमेदवारांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर पाऊच आयोगामार्फत पुरविण्यात येणार होते. परीक्षा केंद्रावर कर्तव्यावरील नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणीदेखील आटोपली आहे.
-------------------
परीक्षांचे गोपनीय साहित्य कलेक्टर कस्टडीत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२० करिता यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आलेली संवेदनशील गोपनीय सामग्री, कोविड किट, हजेरीपट, स्टीकर्स व इतर लेखनसामग्री विषयांकित परीक्षेच्या सुधारित तारीख जाहीर होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षितपणे ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.