संत गुलाबराव महाराज यांच्यावर डाकतिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:59 IST2018-07-18T23:59:04+5:302018-07-18T23:59:19+5:30

प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्यावरील डाक तिकिटाचे प्र्रकाशन १९ डिसेंबर रोजी भक्तिधाम संस्थानात गीता जयंतीच्या मुहूर्तावर होत आहे. अमरावती फिलाटेलिक सोसायटी व श्री संत गुलाबराव महाराज सेवा संस्थान (भक्तिधाम, ता. चांदूरबाजार) यांच्या संयुक्त विद्यमाने याबाबत प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता.

Postmodel on Sant Gulabrao Maharaj | संत गुलाबराव महाराज यांच्यावर डाकतिकीट

संत गुलाबराव महाराज यांच्यावर डाकतिकीट

ठळक मुद्देगीता जयंतीच्या मुहूर्तावर प्रकाशन : भक्तिधाम संस्थानात होणार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्यावरील डाक तिकिटाचे प्र्रकाशन १९ डिसेंबर रोजी भक्तिधाम संस्थानात गीता जयंतीच्या मुहूर्तावर होत आहे.
अमरावती फिलाटेलिक सोसायटी व श्री संत गुलाबराव महाराज सेवा संस्थान (भक्तिधाम, ता. चांदूरबाजार) यांच्या संयुक्त विद्यमाने याबाबत प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. सोसायटीचे अध्यक्ष कृ.ब. निंबाळकर हे प्रस्तावक आहेत. सोसायटीमार्फत आतापर्यंच पाठविलेल्या चार प्रस्तावांपैकी शिवाजीराव तथा दाजीसाहेब पटवर्धन यांच्यावरील डाकतिकीट २७ डिसेंबर २०१७ रोजी प्रकाशित झाले, तर संत गुलाबराव महाराजांवरील डाकतिकीट प्रकाशित होत आहेत. स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब खापर्डे व वीर वामनराव जोशी यांच्यावरील डाकतिकिटाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
विदर्भातील १० महापुरुषांच्या स्मरणार्थ आतापर्यंत डाकतिकीट प्रकाशित झाले आहेत. जमनालाल बजाज यांच्यावरील डाकतिकीट १९७० मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९९५), कर्मयोगी संत गाडगेबाबा (१९९८), डॉ. केशव हेडगेवार (१९९९), कृषिमहर्षी भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख (१९९९), ब्रिजलाल बियाणी (२००२), जवाहरलाल दर्डा (२००५), डॉ. माधव श्रीहरी अणे (२०११), बाबा आमटे (२०१४) व डॉ. शिवाजीराव पटवर्धन (२०१७) यांची डाकतिकिटे प्रकाशित झाली.
विशेष म्हणजे, डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्यानंतर कर्मभूमीतच डाकतिकिटाचे प्रकाशन होणारी संत गुलाबराव महाराज ही अमरावती जिल्ह्यातील दुसरी व्यक्ती ठरणार आहे.

Web Title: Postmodel on Sant Gulabrao Maharaj