शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीच्या आश्वासनानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:56 IST

कोतवालीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रामसिंह गुलाबसिंह चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेतली. सुसाईड नोटमध्ये नोंद असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी रेटून धरली.

ठळक मुद्देएएसआय आत्महत्या प्रकरण : पोलीस उपायुक्तांच्या कक्षात नातेवाईकांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोतवालीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रामसिंह गुलाबसिंह चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेतली. सुसाईड नोटमध्ये नोंद असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी रेटून धरली. पोलिसांनी पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी रामसिंह चव्हाण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची तयारी दर्शविली.सहायक पोलीस उपनिरीक्षक रामसिंह चव्हाण यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत तत्कालीन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण व हेड मोहरीर यांची नावाचा उल्लेख आत्महत्येस कारणीभूत असल्याबाबत केला होता. पोलीस खात्यातील एएसआयची आत्महत्या व त्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. या घटनेकडे पोलीस वर्तुळानेही लक्ष वेधले.नातेवाइकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेऊन रामसिंह चव्हाण यांनी अनुभवलेल्या मानसिक ताणाची जाणीव करून दिली. त्यांनी वेतन मिळविण्यासाठी किती प्रयत्न केले, त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना कशाप्रकारे मानसिक खच्चीकरण केले, याबाबत सर्व इत्थंभूत माहिती रामसिंह यांच्या नातेवाइकांनी डीसीपी सोळंके यांना दिली. रामसिंह यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे संबंधित तत्कालीन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त चव्हाण व हेड मोहरीर यांच्याविरुद्ध कारवाई करा, त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवा, अन्यथा आम्ही मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. यावर डीसीपी सोळंके व शशिकांत सातव यांनी नातेवाइकांना चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईक रामसिंह यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास तयार झाले.इर्विन रुग्णालयात रामसिंह चव्हाण यांच्या मृतदेहाचे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव नातेवाइकांनी ताब्यात घेतले. सायंकाळनंतर रामसिंह चव्हाण यांच्या मृतदेहावर हिंदू स्मशानभूमीवर अत्यसंस्कार करण्यात आले.रामसिंह यांच्यासोबत अपमानास्पद वागणूकरामसिंह चव्हाण सोमवारी सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्तालयात गेले होते. तेथे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ते सर्व बाबींची शहानिशा करणार होते. मात्र, त्यांना एका पोलीस कर्मचाºयाने अपमानास्पद वागणूक देऊन जाण्यास सांगितले. यानंतरच रामसिंह यांनी घरी जाऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईक पोलीस उपायुक्तांना सांगत होते. २०१४ पासून रामसिंह चव्हाण अनेकदा वरिष्ठ अधिकाºयांकडे चकरा घातल्या; मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रामसिंह यांना जोखमीच्या कर्तव्यावर लावले जात असल्याने ते ड्युटीवर जाण्यासाठी भीत होते. त्यातच वेतनाअभावी आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांनी काही जणांकडून पैसे उधारसुद्धा घेतले होते. अशा परिस्थितीत पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी मानसिक खच्चीकरण केल्याने रामसिंह यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे नातेवाइकांनी पोलीस उपायुक्तांना सांगितले. यावेळी रामसिंह यांच्या पत्नी अनिता, त्यांचा मुलगा सागर, अमन व अन्य नातेवाईक उपस्थित होते.निवेदनातील प्रत्येक बाबीची चौकशी करण्यात येईल. रामसिंह चव्हाण यांच्यासोबत २०१४ पासूनच्या जे-जे घडले, त्या बाबी तपासून पाहिल्या जातील. पारदर्शक चौकशी करून दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल.- यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त.एएसआयच्या आत्महत्याप्रकरण नातेवाइकांचे निवेदन प्राप्त झाले. कायद्याच्या चाकोरीत राहून संपूर्ण तथ्ये तपासली जातील. त्यानंतर जे दोषी असतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई करू. चव्हाण कुटुंबीयांना लेखी आश्वासन दिले आहे.- आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा.