विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे; शिक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:42 IST2018-07-28T22:42:33+5:302018-07-28T22:42:52+5:30

विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले. मो. इम्रान अ. रहीम असे त्या शिक्षकाचे नाव आहे.

Pornographic activities with the student; Teacher suspended | विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे; शिक्षक निलंबित

विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे; शिक्षक निलंबित

ठळक मुद्देमो. इम्रान अ. रहीमविरुद्ध कारवाईची मागणी
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले. मो. इम्रान अ. रहीम असे त्या शिक्षकाचे नाव आहे.
अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या किल्ला शाळेवर मो. इम्रान अ. रहीम हा सहायक शिक्षक विद्यार्जनाऐवजी विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत होता. यामुळे विद्यार्थिनी दहशतीत होत्या. शिक्षक इम्रान हा त्यांना दमदाटी करीत होता. एका पीडिताने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. २१ जुलैला मुख्याधिकाºयांकडे तक्रार प्राप्त झाल्यावर तिचे बयाण घेतले गेले. यावरून मुख्याध्यापक अ. हमीद यांनी २३ जुलैला व्यवस्थापन समिती बैठक बोलावून संबंधित पालक, विद्यार्थिनी, सकाळ पाळीप्रमुख व इतरांचे बयान नोंदविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापक हमीद यांनी मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांच्याकडे अहवाल सादर केला. अहवालावरून नागरी सेवा नियम १९७९ चे कलम ४ (१) व न.प. नागरी अधिनियम १९६५ चे कलम ७९ (६) अन्वये शिक्षक मो. इम्रान यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी पालकांची आहे.

सदरच्या शिक्षकाने केलेले कृत्य हे चुकीचे असून, त्यांच्याविरुद्ध वरिष्ठ स्तरावरून कारवाई व्हावी, यासाठी मी पाठपुरावा करेन. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, या बाबीकडे विशेष लक्ष पुरविले जाईल.
- सविता बोबडे, शिक्षण सभापती

Web Title: Pornographic activities with the student; Teacher suspended