अश्लील व्हिडिओ, व्यापाऱ्याला अटक
By Admin | Updated: April 5, 2017 00:03 IST2017-04-05T00:03:15+5:302017-04-05T00:03:15+5:30
शहरातील एका महिला डॉक्टरच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लिल छायाचित्रांसह घाणेरडे संदेश पाठविल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अकोल्यातील एका कापड व्यापाऱ्याला मंगळवारी अटक केली.

अश्लील व्हिडिओ, व्यापाऱ्याला अटक
महिला डॉक्टरची तक्रार : गाडगेनगर पोलिसांची कारवाई
अमरावती : शहरातील एका महिला डॉक्टरच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लिल छायाचित्रांसह घाणेरडे संदेश पाठविल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अकोल्यातील एका कापड व्यापाऱ्याला मंगळवारी अटक केली. कमल हिरानंद गुरूदासानी (४०,रा. सिंधी कॅम्प, अकोला) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार शहरातील एका २७ वर्षीय महिला दंततज्ज्ञाच्या फेसबुकवर दिव्या शर्मा नावाच्या अकाऊंटवरून संदेश व छायाचित्रे पाठविली जात होती. महिला डॉक्टरचा दिव्या शर्मा नावाच्या व्यक्तिशी परिचय नव्हता, हे विशेष. मात्र, काही दिवसांनी महिला डॉक्टरच्या फेसबुकवर अश्लिल व्हिडिओ व संदेश येण्यास सुरूवात झाली. हाप्रकार त्या डॉक्टरने आपल्या भावाला कळविला. हा गंभीर प्रकार बघता त्यांनी गाडनेगर पोलीस ठाण्यात संबंधित फेसबुक अकाऊंटधारकाविरूद्ध तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी अरूण कोडापे, विक्की नशिबकर व अहमद अली यांनी तपासकार्य सुरु केले. हेप्रकरण सायबर सेलशी संबंधित असल्यामुळे फेसबुक अकाऊंटधारकाचा शोध घेण्याचे काम सायबर सेलचे एपीआय कांचन पांडे यांनी तांत्रिक पद्धतीने सुरु केल्यानंतर ते अश्लिल व्हिडिओ व संदेश पाठविणारा फेसबुक अकाऊंटधारक अकोल्यातील कमल गुरूदासानी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलीस पथक अकोल्याला रवाना झाले आणि त्यांनी मंगळवारी आरोपी कमल गुरूदासानीला अटक केली.