लोकसंख्या पाच हजार, तरीही मोबाईल सेवेचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:36+5:302021-05-07T04:13:36+5:30
मोझरी ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार गावाची ४,६५० लोकसंख्या असलेल्या मतदार राजांच्या गावाला आजही तंत्रज्ञानाचे वावडे आहे. या गावाच्या वेशीवर पोहचण्यास आजही ...

लोकसंख्या पाच हजार, तरीही मोबाईल सेवेचे वावडे
मोझरी ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार गावाची ४,६५० लोकसंख्या असलेल्या मतदार राजांच्या गावाला आजही तंत्रज्ञानाचे वावडे आहे. या गावाच्या वेशीवर पोहचण्यास आजही शासकीय सहखासगी नेटवर्क सेवा नावापुरते उरले आहे. शासनाच्या भारत संचार निगम मोबाईल सेवा इतरांच्या तुलनेत थोडी सरस असली तरी बेअसर आहे. मागील एक वर्षांपासून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक सत्र घेण्यात आले. पण ज्या गावात पूर्ण कार्यक्षम नेटवर्क सेवा नाही तिथे शिक्षण कसे घेतले गेले असेल याची फक्त कल्पना करता येईल. अनेकदा शासकीय कामकाजाचा नेटवर्क नसल्याने खोळंबा होत आहे. गावात दगडाखाली गाव नेता आहे. पण गावकऱ्यांच्या आवश्यक प्रश्नावर नेहमी नासमजचे सोंग घेऊन जगत असतात. आज सर्वत्र साथीच्या आजाराचे थयथयाट सुरू आहे. नवनियुक्त सरपंच सुरेंद्र भिवगडे यांनी ही समस्या निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला असून, भारत दूसंचार निगमच्या माध्यमातून लवकर गावकऱ्यांना उत्तम सेवा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तंत्रज्ञान काळाची गरज
मोझरी गावातील युवा पिढी होतकरू असून प्रयोगशील आहे. त्यांना स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी ही समस्या निकाली काढणे क्रमप्राप्त आहे. याचाच एक भाग म्हणून मोझरी ग्रामपंचायतने पुढाकार घेत भारत संचार निगमच्या मोबाईल नेटवर्क टॉवर उभारणीकरिता जागा उपलब्ध करून दिली. येत्या काही दिवसांत तांत्रिक बाबीची पूर्तता प्रशासकीय स्तरावर झाल्यास लवकरच गावकऱ्यांना समस्या समाधान मिळेल. त्यासाठी ग्रामपंचायत मोझरी पाठपुरावा करेल, असे सुरेंद्र भिवगडे यांनी सांगितले.