बेलोरा-लोणी रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:12 IST2021-01-21T04:12:39+5:302021-01-21T04:12:39+5:30

वरूड : बेलोरा ते लोणी रस्त्यावर असलेल्या पुलाचे काम निकृष्ट झाले असून, सळाखी उघड्या पडल्या तसेच सिमेंटसुद्धा निघाले आहे. ...

Poor work on Belora-Loni road bridge | बेलोरा-लोणी रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट

बेलोरा-लोणी रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट

वरूड : बेलोरा ते लोणी रस्त्यावर असलेल्या पुलाचे काम निकृष्ट झाले असून, सळाखी उघड्या पडल्या तसेच सिमेंटसुद्धा निघाले आहे. याबाबत विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा महासचिव सर्वेश ताथोडे यांनी गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करून कंत्राटदाराविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. तीन दिवसांत पुलाचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

वरूड तालुक्यातील बेलोरा लोणी रस्त्यावर बांधलेला पूल अल्पावधीतच निकृष्ट ठरला आहे. या पुलावर वापरलेल्या सळाखी सिमेंट काँक्रीटमधून बाहेर पडल्या आहेत. सिमेंट फुटल्याने पुलावरून वाहन नेणे, चालणे धोकादायक झाले आहे. याबाबत कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी तसेच नागरिकांना रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा महासचिव सर्वेश ताथोडे यांनी गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारीद्वारे केली आहे.

Web Title: Poor work on Belora-Loni road bridge