दर्यापूर न्यायालयाच्या इमारतीचे निकृष्ट बांधकाम
By Admin | Updated: July 27, 2015 00:30 IST2015-07-27T00:30:39+5:302015-07-27T00:30:39+5:30
येथील मध्यवस्तीत बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा....

दर्यापूर न्यायालयाच्या इमारतीचे निकृष्ट बांधकाम
शासनाचे वेधले लक्ष : तालुक्यातील विविध समस्या विधानसभेत
दर्यापूर : येथील मध्यवस्तीत बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा मुद्दा आमदार रमेश बुंदिले यांनी २३ जुलै रोजी विधानसभेच्या अधिवेशनातील सभागृहात उपस्थित करून याकडे शासनाचे लक्ष वेधले.
दर्यापूरच्या न्यायालयाला नुकतेच आमदार बुंदिले यांनी भेट देऊन पाहणी केली होती. येथील इमारतीला मोठ्या भेगा पडल्या असून तत्कालीन करण्यात आलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे व मातीचे कुठलेही परिक्षण न करता बांधण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. येथील वकील संघालाही त्यांनी भेट दिली होती. तसेच दर्यापूर तालुक्यातील सुकळी या गावाला शहानूर नदीच्या तीरावर असलेले सुकळी येथील नागरिकांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील ५६ कुटुंबाचे तातडीने पुनर्वसन करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला असून तसा प्रस्तावही शासनाकडे सादर केला आहे. आतापर्यंत ४ नागरिकांची घरे जमिनदोस्त झाली असून संपूर्ण गावालाच भूस्खलनाचा धोका आहे. त्यामुळे २१ जुलै रोजी सुकळी येथील भूस्खलनाचा प्रश्नही औचित्याचा मुद्दा म्हणून उपस्थित केला आहे. चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार बुंदिले यांनी एकूण ४४ प्रश्ने मांडले त्यापैकी काही प्रश्न तारांकित होऊन त्यावर अधिवेशनात चर्चा झाली तर काही प्रश्न अतारांकित स्वीकृत म्हणून त्यावर शासनाची लेखी उत्तर मिळणार आहे. या प्रश्नामध्ये दर्यापूर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सुरू करणे, तालुक्यात चंद्रभागा बॅरेज, वाघाडी बॅरेज, सामदा व खैरकुंड तलावाचे काम अर्धवट असून निधीअभावी बंद असल्याबाबत दर्यापूर येथील संत गाडगेबाबा सहकारी सुतगिरणी बंद आहे.