शहरातील अंतर्गत रस्त्यांची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:38+5:302021-02-05T05:29:38+5:30

---------------------- महापालिकेत आवागमण वाढल्याने कोरोना धोका अमरावती : विविध कामानिमित्त नागरिकांची आवक वाढल्याने वाहनांसह नागरिकांची चिक्कार गर्दी प्रत्येक विभागात ...

Poor condition of internal roads in the city | शहरातील अंतर्गत रस्त्यांची दैनावस्था

शहरातील अंतर्गत रस्त्यांची दैनावस्था

----------------------

महापालिकेत आवागमण वाढल्याने कोरोना धोका

अमरावती : विविध कामानिमित्त नागरिकांची आवक वाढल्याने वाहनांसह नागरिकांची चिक्कार गर्दी प्रत्येक विभागात दिसून येत आहे. मात्र, कुठेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नसल्यामुळे कोरोनाचा धोका बळावत आहे.

-----------------------

हरभरा उत्पादकांची कार्यशाळा

फोटो जे-३१- कार्यशाळा

अमरावती : वलगावनजीकच्या नया अकोला येथील शेतकरी प्रकाश साबळे यांच्या शेतात हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा शनिवारी घेण्यात आली. यामध्ये प्रक्षेत्र प्रबंधक श्याम टिकस, अनिल ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतिशील १४ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

----------------------

शिव इंग्लिश हुतात्मा दिन

अमरावती : येथील बापू कॉलनीतील इंग्लिश स्कूलमध्ये हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल तरडेजा, प्रभारी मुख्याध्यापक उमेश वांडे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

--------------------

जिल्हा कचेरीत वाहने अस्ताव्यस्त

अमरावती : जिल्हा कचेरीत कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे वाहनांची गर्दी झाली आहे. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जाते. त्यामुळे इतरांना वाहन काढताना नाहक कसरत करावी लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

--------------------------

Web Title: Poor condition of internal roads in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.