शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

रिक्त ४२ सदस्यपदांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:58 IST

जिल्ह्यात ३२ ग्रामपंचायतींच्या रिक्त ३८ व सार्वत्रिक निवडणूक असलेल्या रूईपठार येथील सरपंचपदासह चार अशा एकूण ४२ पदांसाठी २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. या दिवशी संबंधित निवडणूक क्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुटी किंवा मतदानासाठी दोन ते तीन तासांची सुटी जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे३२ ग्रा.पं.ची पोटनिवडणूक : मतदानासाठी स्थानिक सुटी जाहीर

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात ३२ ग्रामपंचायतींच्या रिक्त ३८ व सार्वत्रिक निवडणूक असलेल्या रूईपठार येथील सरपंचपदासह चार अशा एकूण ४२ पदांसाठी २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. या दिवशी संबंधित निवडणूक क्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुटी किंवा मतदानासाठी दोन ते तीन तासांची सुटी जाहीर केली आहे.या निवडणुकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ७६ सदस्यपदे रिक्त राहिली, तर एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ७५ पदे अविरोध निवडली गेली. ३८ मतदान केंद्रांवर ही निवडणूक होत आहे. यामध्ये १८,६१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. धारणी च चिखलदरा तालुका हे संपूर्ण क्षेत्र हे अनु. जमातीसाठी राखीव आहे. जात वैधता समितीकडे अपूर्ण कागदपत्रे असल्यामुळे उमेदवारांना पोच मिळू शकली नाही. इतर तालुक्यातील राखीव प्रभागात जात वैधतेची अशीच स्थिती असल्यामुळे बहुतांश सदस्यपदे रिक्त राहिली. या ठिकाणी आता आरक्षणात बदल करण्यात येणार आहे.या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूकअमरावती तालुक्यात इंदला, पुसदा, जळका शहापूर, भातकुली तालुक्यात आष्टी, बैलमारखेडा, कानफोडी, निरूळ गंगामाई, धामणगाव तालुक्यात तळेगाव दशासर, वळगाव, रासदी, हिंगणगाव नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दाभा, चांदूररेल्वे तालुक्यात चांदूरवाडी, मोर्शी तालुक्यात आष्टोली, दापोरी, गोराळा वरूड तालुक्यात राजुरा बाजार, बेलोरा, चांदूरबाजार तालुक्यात जवळा शहापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात सातेगाव, खिराळा, कारला दर्यापूर तालुक्यात सामदा, पिपंळखुटा चिखलदरा तालुक्यात मेहरीआम, आवागड, कोयलारी, सोनापूर, गडभांडूम, धारणी तालुक्यात राणापीसा, चाकर्दा, बोबदो, चेडो येथे पोटनिवडणूूक होत आहे.२६ ते २८ पर्यंत दारूचे दुकान, बार बंदग्रामपंचायत पोटनिवडणूक निमित्याने निवडणूक क्षेत्रातील मद्यविक्रीची बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे, तर यासर्व ठिकाणी मतदानाच्या दिवशी असणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी निवडणूक कामकाजासाठी २६ ते २८ तारखेपर्यंत वीजपुरवठा खंडित करू नये अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.