शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

२५१८ केंद्रांवर आज मतदान पथके रवाना; उद्याच्या मतदानासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:04 IST

जिल्हाधिकारी : लोकशाहीच्या उत्सवासाठी प्रशासन सज्ज, पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत बुधवार २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. आहे. यासाठी सर्व मतदारसंघांत तयारी झालेली आहे. मेळघाटात दुर्गम भागात असलेल्या १९० मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान पथके रवाना झाली तर उर्वरित २,५१८ केंद्रांसाठी मंगळवारी पथके रवाना होतील. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. यावेळी मतदानाचा उच्चांकी ७० टक्का पार करेल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेसाठी असलेल्या पथकात २,७०८ मतदान केंद्राध्यक्ष, ८,१२४ मतदान अधिकारी असे एकूण १०,८३२ कर्मचारी याशिवाय १,०८९ राखीव असे ११,९१९ कर्मचारी आवश्यक आहे. या सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यात आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारीदेखील केंद्रांवर मतदारांच्या सहकार्यासाठी राहणार आहे. मतदार चिठ्ठयांचे वाटप शहरात ज्या ठिकाणी राहिले, त्यांना सोमवारी वाटप होईल. सर्व मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. 

३१९ परवानाधारकांचे अग्निशस्त्र जमा; विशाल आनंद आचारसंहितेच्या काळात ग्रामीणमधील ३१९ परवानाधारकांचे अग्निशस्त्र जमा करण्यात आलेले आहे. चार जणांकडून प्रतिसाद नसल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे. १०७ जणांवर प्रतिबंधात्मक व तीन जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. स्थानिक पोलिसांशिवाय सेक्टर पेट्रोलिंग सुरू आहे. सुरक्षा बंदोबस्तासाठी सात कंपनी उपलब्ध आहेत.

९७० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; नवीनचंद्र रेड्डी आचारसंहितेच्या काळात पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ९७० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. नॉनबेलेबल वॉरंट असणाऱ्या ९५१ पैकी ६१० जणांना कोर्टासमोर उभे करण्यात आले. चार जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. १५ ऑक्टोबरपासून ३०,१६१ लीटर दारू, ४२ आरोपींजवळून शस्त्र जप्त करण्यात आले. ३४ किलो गांजा, २.८१ कोटींची कॅश जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावती