कडाक्याच्या थंडीत मेळघाटात राजकारण तप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST2021-01-15T04:11:34+5:302021-01-15T04:11:34+5:30
धारणी : तालुक्यातील काटकुंभ ग्रामपंचायत अविरोध झाल्याने ३४ ग्रामपंचायतींमधील २८० जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होऊ घातले आहे. ४६ ...

कडाक्याच्या थंडीत मेळघाटात राजकारण तप्त
धारणी : तालुक्यातील काटकुंभ ग्रामपंचायत अविरोध झाल्याने ३४ ग्रामपंचायतींमधील २८० जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होऊ घातले आहे. ४६ जागा बिनविरोध झाल्या. तर, उमेदवारी अर्ज न आल्याने ७ जागा रिक्त राहिल्या आहेत.
काटकुंभ ग्रामपंचायतमधील सर्व जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. काटकुंभसह जिरातढाणा आणि आठनदा या तीन गावांचा समावेश असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे केवळ चार उमेदवारी अर्ज आले. बन्सीलाल झापरे धांडे, नानकराम मावास्कर, रामचंद्र ओमकार जांबेकर आणि ज्योती दीपकुमार अहिऱ्या या चार जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आल्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. या ग्रामपंचायतींत एकूण सात जागा असून तीन जागांकरिता अर्ज न आल्याने त्या रिक्त राहिल्या. आपत्कालीन स्थितीत प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली.
----------------