शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भूमिपूजनाचा वाद अन् पॅालिटिकल ड्रामा; आजी- माजी आमदारांचे समर्थक आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 12:28 IST

आजी-माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये फलक लावण्यावरून आणि श्रेयवादातून जोरदार घोषणाबाजी अन् तू-तू-मै-मै झाली.

ठळक मुद्देधामणगाव मतदारसंघ पुन्हा हॅाट

नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : आजी-माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये फलक लावण्यावरून आणि श्रेयवादातून जोरदार घोषणाबाजी अन् तू-तू-मै-मै झाली. त्यामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील रस्ते विकासकामांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम शनिवारी चांगलेच गाजले. तिन्ही तालुक्यांत हा पॉलिटिकल ड्रामा सुरू होता. दरम्यान, पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मध्यस्थी करीत शासकीय नियमानुसार नव्याने फलक लावण्याचे आदेश दिल्याने हा वाद तात्पुरता शमला. मात्र प्रत्येक भूमिपूजन स्थळी आजी- माजी आमदारांचे समर्थक घोषणा देत होते. त्यामुळे हे भूमिपूजन शासकीय की राजकीय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत धामणगाव रेल्वे मतदारसंघात रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. लोणी येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू असताना धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड आपल्या समर्थकांसह तेथे पोहोचले. या कार्यक्रमाची आपल्याला कल्पनाही देण्यात आली नव्हती, ही बाब त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

तयार करण्यात आलेले फलकही शासकीय नियमानुसार नसल्याचे आमदार अडसड यांनी पालकमंत्र्यांना सांगताच ॲड. यशोमती ठाकूर यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना सुधारित फलक लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर आमदार प्रताप अडसड पुढील कार्यक्रमात सामील झाले. मात्र यावेळी जो पॅालिटिकल ड्रामा सुरू झाला तो पालकमंत्र्यांनाही अपेक्षित नव्हता. आमदार प्रताप अडसड आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या समर्थकांनी घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण तापले होते. दोन्ही नेत्यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली. आपापल्या पक्षांचे झेंडे झळकावले. आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून धरले. नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूरनावरून राजकारण तापले असताना प्रशासनाने मात्र चुप्पी साधल्याचे दिसून आले. तर कार्यकर्ते आक्रमक होते.

अन् पालकमंत्र्यांनी दाखविले राजकीय सामंजस्य

धामणगाव रेल्वे मतदारसंघात शनिवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते घेण्यात आले, मात्र, अनवधानाने आयोजकांकडून आमदार प्रताप अडसड यांचे नाव भूमिपूजन फलकावर टाकण्यात आले नव्हते. ही बाब शासकीय कार्यक्रमात नियमसंगत नाही, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे भूमिपूजनाच्या सर्व फलकांवर आमदार प्रताप अडसड यांचे नाव अंकित करून नव्याने फलक लावा, असा पवित्रा ठाकुरांनी घेतला आणि राजकीय सामंजस्य दाखविले. त्यामुळे आजी-माजी आमदार समर्थकांमधील भूमिपूजन फलकाचा वाद थांबला.

शासकीय कार्यक्रम असो वा भूमिपूजन यात स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलू नये, असा प्रोटोकॅाल आहे. तथापि शनिवारच्या भूमिपूजन कार्यक्रमाची आपणास माहिती देण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर आमदार म्हणून आपले नाव नव्हते. ही बाब आपण पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी लगेच याची दखल घेतली. आपल्या पालकमंत्र्यांवर कुठलाही आक्षेप नाही.

प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वे

दोन महिन्यांपूर्वी खासदार व आमदार यांनी पालकमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्ष यांना न बोलावता परस्पर भूमिपूजन उरकले होते. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता पालकमंत्र्यांना बोलावून हे भूमिपूजन घ्यावे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले.

वीरेंद्र जगताप, माजी आमदार

सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अशा तीन यंत्रणांच्या विविध कामांचे भूमिपूजन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी धामणगाव मतदारसंघात होते. भूमिपूजनाचे फलक कोणत्याही यंत्रणांनी लावले नाहीत. मात्र, शासकीय नियमानुसार भूमिपूजन फलक लावण्यासंदर्भात पालकमंत्री सूचना देतील, तशी कार्यवाही केली जाईल.

आय. आय. खान, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, अमरावती

टॅग्स :PoliticsराजकारणMLAआमदारYashomati Thakurयशोमती ठाकूर