गावपुढाऱ्यांवर राजकीय गंडांतर
By Admin | Updated: February 20, 2015 00:13 IST2015-02-20T00:13:54+5:302015-02-20T00:13:54+5:30
तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून २८ गावांत २६२ सदस्य निवडले जाणार आहेत.

गावपुढाऱ्यांवर राजकीय गंडांतर
रोशन कडू तिवसा
तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून २८ गावांत २६२ सदस्य निवडले जाणार आहेत. यापैकी १४४ महिला सदस्य निवडले जाणार आहेत. पुरुषांना मात्र ११८ जागा मिळणार आहेत. यातही पुन्हा अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण या दोन संवर्गाचे आरक्षण आहेत. परिणामी गाव पुढाऱ्यांवर आता राजकीय गंडांतर येणार असल्याने हे पुढारी हवालदिल झाले आहे.
तिवसा तालुक्यातील २८ गावांतील ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. या प्रभाग आरक्षणावरील आक्षेपाची मुदत संपली आहे. तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार निवडणूक विभागाने महिला आरक्षण जाहीर केले आहे. २८ गावांतून एकूण २६२ सदस्य निवडून येतील. प्रभाग आरक्षणात यातील १४४ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. २८ गावांमध्ये अनुसूचित जातीसाठी ३०, अनुसूचित जमातीसाठी १०, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३७ तर सर्वसाधारणसाठी ६७ अशा १४४ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तिवसा ग्रामपंचायतीत १७ सदस्य असून त्यामध्ये ९ महिला आहे. मोझरी व वऱ्हा या ग्रा.प. १३ सदस्य असून त्यामध्ये ७ महिला राखीव आहेत. गुरूदेवनगर, शिरजगाव मोझरी येथे. ११ सदस्य आहेत. यामध्ये ६ महिला राखीव आहे. वरखेड, शेंदोळा खुर्द, मार्डा, शेदोळा बु., माळेगाव, भिवापूर, शेंदूरजना बाजार, शिवणगाव व सातरगाव या ग्रा.प. ९ सदस्य असून ३ जागा महिला आरक्षित आहेत. बोर्डा, सार्सी, मूर्तिजापूर, चेनुष्टा, धोत्रा, सुरवाडी, धामंत्री, वाठोडा खुर्द, भारवाडी, दापोरी, वणी, जावरा या ग्रा.प.त ७ सदस्य असून यामध्ये ४ आरक्षित आहेत. तळेगाव ठाकूर येथील १५ सदस्य ८ जागा तर कुऱ्हा येथील १७ जागा आहे. येथे ९ जागा महिलांसाठी आरक्षित आहे.