नेत्यांचा पक्षबदल; कार्यकर्त्यांची कोंडी

By Admin | Updated: September 27, 2014 23:05 IST2014-09-27T23:05:19+5:302014-09-27T23:05:19+5:30

युती- आघाडी फिस्कटल्याने स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी स्वप्नपूर्तीसाठी पक्षांतराचा निर्णय घेतला. शुक्रवार हा पक्षांतराचा वार ठरला. नेत्यांच्या या

Political leaders; Workers' closure | नेत्यांचा पक्षबदल; कार्यकर्त्यांची कोंडी

नेत्यांचा पक्षबदल; कार्यकर्त्यांची कोंडी

संभ्रम कायम : नव्या समीकरणांची नांदी
गणेश वासनिक - अमरावती
युती- आघाडी फिस्कटल्याने स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी स्वप्नपूर्तीसाठी पक्षांतराचा निर्णय घेतला. शुक्रवार हा पक्षांतराचा वार ठरला. नेत्यांच्या या पक्षबदलामुुळे सामान्य कार्यकर्त्यांची मात्र ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी स्थिती झाली होती.
कालपर्यंत धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या गप्पा करणाऱ्यांनी आज हिंदुत्ववादी पक्षाचा ध्वज हाती घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. ज्या विचारसरणीचा वर्षानुवर्षे विरोध केला त्याच पक्षाचा ध्वज खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने उभे राहण्याची साद घालताना दिसत आहेत. पूर्वीच्या निवडणुका या राजकीय विचारसरणी, ध्येयधोरण, उमेदवारांची कार्यशैली, मतदारांशी बांधिलकी या प्रमुख घटकांवर आधारित असायच्या. मात्र, राजकारणाचे व्यापारीकरण होताच ज्यांचे ‘खिसे गरम तोच आमदार’ असे नवे समीकरण उदयास आले आहे.

Web Title: Political leaders; Workers' closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.