तिवसा : नागपूर येथून परत अमरावतीकडे जाणाऱ्या एका पोलीस व्हॅनने मोझरीजवळ एका कारला मागून जोरदार धडक दिली. यात कारमधील रुग्ण जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.पोलीस सूत्रांनुसार, अमरावती पोलीस आयुक्तालयातील हेडकॉन्स्टेबल मिलिंद तायडे हे नागपूर येथे एमएच २७ ए ९५०४ क्रमांकाच्या पोलीस व्हॅनने बॅरिकेड्स घेऊन गेले होते. तेथून रात्री ११ वाजताच्या सुमारास परत येत असताना गुरुकुंज मोझरी बस स्थानकासमोरील स्पीडब्रेकरवर पुढे असलेल्या कार (एमएच २७ बीझेड ०६५२) ला जोरदार धडक दिली. सदर कारमधून नागपूर येथील रुग्णास अमरावतीला घेऊन निघाले होते. या धडकेत रुग्णास चांगलीच दुखापत झाली असून, कारचेसुद्धा नुकसान झाल्याची तक्रार फिर्यादी अभिजित ओंकार नेवरकर (२४, रा. दर्यापूर) यांनी तिवसा पोलिसांत दाखल केली. तिवसा पोलिसांनी मिलिंद तायडेविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला.खासदारांनी दिली अपघाताची माहितीनागपूर येथून परत अमरावती कडे जात असताना खासदार नवनीत राणा यांच्या निदर्शनास अपघात येताच त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती तिवसा ठाणेदार गोपाल उंबरकर यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला व गुन्हा दाखल केला.
पोलीस व्हॅनची कारला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST
पोलीस सूत्रांनुसार, अमरावती पोलीस आयुक्तालयातील हेडकॉन्स्टेबल मिलिंद तायडे हे नागपूर येथे एमएच २७ ए ९५०४ क्रमांकाच्या पोलीस व्हॅनने बॅरिकेड्स घेऊन गेले होते. तेथून रात्री ११ वाजताच्या सुमारास परत येत असताना गुरुकुंज मोझरी बस स्थानकासमोरील स्पीडब्रेकरवर पुढे असलेल्या कार (एमएच २७ बीझेड ०६५२) ला जोरदार धडक दिली.
पोलीस व्हॅनची कारला धडक
ठळक मुद्देमोझरीजवळील घटना : तिवसा पोलिसांत गुन्हा दाखल