शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पोलीस शिरले समोरून, चोर पळाले घरामागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:14 PM

पोलीस एका घरात समोरून शिरले आणि मागील दाराने चोर पळाल्याचा प्रकार सातुर्णा स्थित गुप्ता ले-आऊटमधील रहिवासी अरुण प्रल्हाद मोहोड यांच्याकडे घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस एका घरात समोरून शिरले आणि मागील दाराने चोर पळाल्याचा प्रकार सातुर्णा स्थित गुप्ता ले-आऊटमधील रहिवासी अरुण प्रल्हाद मोहोड यांच्याकडे घडला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरांचा घरफोडीचा प्रयत्न फसला.घरफोडी व चोरीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस सतर्कतेने पेट्रोलिंग करीत आहेत. प्रत्येक घरावर पोलीस बारीक नजर ठेवत असून, संशयास्पद आढळल्यास तत्काळ शहानिशा करीत आहेत. या अनुषंगाने राजापेठचे पोलीस शिपाई दानिश शेख व अमोल खंडेझोड हे सातुर्णा ते क्रांती कॉलनी मार्गातील गुप्ता ले-आऊट परिसरात मंगळवारी रात्री दुचाकीने गस्त लावत होते. त्यांना डेप्युटी सीईओ अशोक मोहोड यांच्या घराचे दार बंद होते, तर फाटकाला बाहेरच्या बाजूने कुलूप असल्याचे आढळून आले. त्यामुळे अमोल खंडेझोड भिंतीवरून आत डोकावले, तर दानिश शेख हे शेजारी विचारणा करण्यासाठी गेले. यावेळी अमोल खंडेझोड व घरात शिरलेल्या चोराची नजर भिडली. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पुढील दारातून घरात प्रवेश केला. तोपर्यंत चोर मागील दाराने पळून जाण्यात यशस्वी झाला. चोराने घरामागील जगंल परिसरात धूम ठोकली होती. पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला. मात्र, त्याच्यापर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. राजापेठ ठाण्यातील पोलीस ताफा उशिरा रात्री घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली होती.सातुर्णा येथील प्रकार : डेप्युटी सीईओकडे चोरीचा प्रयत्न१२ लाखांचा ऐवज बचावलाअशोक मोहोड हे यवतमाळ येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. बुधवारी ते काही कामानिमित्त घराबाहेर होते. त्यांनी समोरच्या दाराला व फाटकाला कुलूप लावले होते. चोरांना दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या घरात सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल होता. पोलिसांच्या सतर्कतेने हा मुद्देमाल सुरक्षित राहिला.