पोलीस आत्महत्या प्रकरण गृहमंत्र्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST2021-01-04T04:11:26+5:302021-01-04T04:11:26+5:30
फोटो पी ०३ भुयार वरूड : पोलीस शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देऊन त्यांच्या पत्नीला ...

पोलीस आत्महत्या प्रकरण गृहमंत्र्यांकडे
फोटो पी ०३ भुयार
वरूड : पोलीस शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देऊन त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. मूळचे वरूड तालुक्यातील पोलीस शिपाई हर्षल लेकुरवाळे यांनी १९ डिसेंबर रोजी नागपूर येथील पोलीस वसाहतीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तेथील सहायक उपनिरीक्षक सुधीर बघेल, नायक पोलीस कॉन्स्टेबल मनीष मोरे व हे़कॉन्स्टेबल राजेश चंदेल यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहोत, अशी सुसाईड नोटदेखील तेथे मिळाली. त्याअनुषंगाने लेकुरवाळे यांच्या मृत्यूची सखोल तपासणी करून दोषींना शिक्षा देण्यात यावी, संबंधितांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करण्यात आली.