अमरावती : हाती चाकू व तलवार घेऊन फेसबुकवर फोटो पोस्ट करणाऱ्या ३८ वर्षीय इसमाचा शोध घेत त्याच्याकडून ती शस्त्रे जप्त करण्यात आली. संतोष चतुर्भुज बजाज (३८, रा. कपिलवस्तूनगर, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट -२ चे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने ६ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. संतोष चतुर्भुज बजाज याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर तलवार व चाकू घेऊन फोटो पोस्ट करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याच्या राहत्या घरून तलवार व चाकू जप्त केला. आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.