तिवसा येथील अशोकनगरात हातभट्टीवर पोलिसांचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST2021-05-06T04:14:16+5:302021-05-06T04:14:16+5:30
तिवसा : शहरातील अशोकनगरात अवैधरीत्या सुरू असलेल्या हातभट्टद्दारू अड्ड्यावर तिवसा पोलिसांनी बुधवारी दुपारी धाडसत्र राबविले. यात एकूण ९०० लिटर ...

तिवसा येथील अशोकनगरात हातभट्टीवर पोलिसांचे धाडसत्र
तिवसा : शहरातील अशोकनगरात अवैधरीत्या सुरू असलेल्या हातभट्टद्दारू अड्ड्यावर तिवसा पोलिसांनी बुधवारी दुपारी धाडसत्र राबविले. यात एकूण ९०० लिटर मोहा-सडवा तसेच ७५ लिटर गावठी दारू जप्त व नष्ट करण्यात आली. एका आरोपीला अटक केली, तर दोघे पसार झाले.
अशोकनगर येथील हातभट्टी दारू अड्ड्याबाबत तिवसा पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार रिता उईके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेश पांडे, सहायक निरीक्षक भारती, शिपाई मीनेश खांडेकर, राजू ठाकरे, रवींद्र खंडारे, प्रमोद ठाकरे, रोशन नंदरधने, जितू थोरात आदी महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी धाडी टाकून दारू गाळण्यासाठी वापरलेले लोखंडी ड्रम, टोपले, झाकण्या व ९०० लिटर मोहा-सडवा आणि ७५ लिटर गावठी दारू असा २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी तिघांविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.