निवडणुकीतील काळा पैसा पोलीस दप्तरी जमा

By Admin | Updated: July 14, 2016 00:17 IST2016-07-14T00:17:56+5:302016-07-14T00:17:56+5:30

सन- २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्हा ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ....

The police money deposited in the black money | निवडणुकीतील काळा पैसा पोलीस दप्तरी जमा

निवडणुकीतील काळा पैसा पोलीस दप्तरी जमा

७० लाख आले कोठून : स्पष्टीकरण देण्यास फिर्यादीची असमर्थता
मनीष कहाते अमरावती
सन- २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्हा ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान सुमारे ७० लाख रुपये रोख जप्त केले होते. परंतु संबंधितांनी या रक्कमेबाबत योग्य स्पष्टीकरण न दिल्याने संपूर्ण रक्कम पोलीस स्टेशनमध्ये ‘जैसे थे’ पडून आहे. शेवटी न्यायालयामध्ये जप्तीच्या नोटाचे प्रकरण सुरु आहे.
जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, धारणी, परतवाडा, चिखलदरा, तळेगाव दशासर, दत्तापूर, चांदूर रेल्वे, आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यामध्ये सर्वाधिक रक्कम धारणी पोलीस ठाण्यांमध्ये ११ लाख ३१ हजार २०० रुपये २२ किलो चांदीचा समावेश होता. परंतु पोलिसांनी तपासात हा मुद्देमाल एका व्यापाऱ्यांचा असल्याचे निष्पन्न झाल्याने तो परत करण्यात आला आहे.

Web Title: The police money deposited in the black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.