विनयभंगानंतर पोलिसाची मुलीला मारहाण

By Admin | Updated: September 3, 2016 00:04 IST2016-09-03T00:04:47+5:302016-09-03T00:04:47+5:30

पोलिसाने एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला.

Police molested after policeman | विनयभंगानंतर पोलिसाची मुलीला मारहाण

विनयभंगानंतर पोलिसाची मुलीला मारहाण

हंसराज कॉलनीतील घटना : गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल 
अमरावती : पोलिसाने एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला. शैलेश दीपक वानखडे (२५,रा. एकविरा नगर) असे आरोपीचे नाव असून तो ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती सूंत्रानी दिली.
शहरातील एका १७ वर्षीय मुलगी ही शिक्षण घेत असताना आरोपी शैलेश वानखडे हा तिचा पाठलाग करायचा. वर्षभरातून तो तिचा मागोवा घेत दररोज टॉटिंग करून छेड काढायचा. वाईट नजरेने पाहून तिला हातवारे करायचा. याबाबत मुलीने शैलेशला हटकले, मात्र, त्याचे हे कृत्य सुरूच होते. गुरुवारी पुन्हा ती मुगली शिकवणी वर्गाकरिता जाताना शैलेशने तिला रस्त्यात अडवून छेड काढली असता दोघांत वाद झाला. मात्र, यावेळी शैलेशने तिच्या श्रीमुखात लगावली.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके यांच्यासह गाडगेनगर पोलिसांनी चौकशी केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३५४ (ड)(अ), ३२४, ५०६, ५०४, पॉक्सो १२ नुसार गुन्हा नोंदविला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहे.


पीडित मुलीला भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य
पीडित मुलीवर अत्याचारांची माहिती भाजपा पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस विभागाला याबाबत कळविले. पीडित मुलीला सहकार्य करीत तिच्या तक्रारीची दखल घेण्यास सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनीही तत्काळ दखल शैलेश वानखडेविरुध्द गुन्हा नोंदविला.

पोलीस आयुक्तांचे विशेष लक्ष
पोलिसाने मुलीची छेड काढल्याचे माहिती पडताच पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी तत्काळ दखल घेत गाडगेनगर पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष केंद्रित केले. आरोपीला अटक करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेलासुध्दा दिले आहे.

Web Title: Police molested after policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.