पोलिसांनो, शरीरयष्टी चांगली ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:20 IST2019-01-14T23:19:26+5:302019-01-14T23:20:08+5:30
जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांनी आपली शरीरयष्टी चांगली ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचवेळी ते जनतेच्या सुरक्षेसाठी धावपळ करू शकतात, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी पोलीस व्यायाम शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

पोलिसांनो, शरीरयष्टी चांगली ठेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांनी आपली शरीरयष्टी चांगली ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचवेळी ते जनतेच्या सुरक्षेसाठी धावपळ करू शकतात, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी पोलीस व्यायाम शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
पोलीस आयुक्तालयातील पोलिसांसाठी पोलीस मुख्यालय येथे पोलीस (जीम) व्यायाम शाळेचे सोमवारी उद्घाटन झाले. कार्यक्रमात पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, यशवंत सोळंके, प्रदीप चव्हाण मंचावर होते. पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या उत्तम कामगिरीचे अभिनंदन केले. पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेचे व्रत घेतले असून, त्यासाठी ते अहोरात्र झटतात. त्याच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहित करायलाच हवे, असे ना. पोटे म्हणाले. मी पोलीस विभागाच्या पाठीशी आहे, पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेसोबत स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, त्यासाठी व्यायाम करून शरीरयष्टी उत्तम ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक शैलेंद्र कस्तुरे व सायबरचे एपीआय कांचन पांडे, तर आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी केले.
व्यायाम शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाºया पोलिसांना प्रशस्तीप्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सायबरचे कांचन पांडे, पीएसआय ईश्वर वर्गे, गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे, पीएसआय शंकर डेडवाल, गुन्हे शाखेचे पीएसआय राम गिते, वलगावचे ठाणेदार दुर्गेश तिवारी, वाहतूक शाखेचे अर्जुन ठोसरे, गागुर्डे, नांदगाव पेठचे कैलास पुंडकर, महिला सेलच्या नीलिमा आरज, राजापेठचे किशोर सूर्यवंशी, कोतवालीचे दिलीप पाटील, फ्रेजरपुºयाचे आसाराम चोरमले, नागपुरी गेटचे दिलीप चव्हाण, बडनेराचे शरद कुळकर्णी यांच्यासह पीएसआय सुदाम आसोरे, गणेश अहिरे, प्रशांत जंगले यांच्यासह आदींना गौरविण्यात आले.
सीपींच्या मनोगतात ‘लोकमत’चा उल्लेख
पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पोलिसांना जनतेसोबत संपर्क वाढवावा व जनतेला विश्वास घेऊन त्यांच्या सहकार्याने आपले काम करावे, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी व्यायामशाळेचा उपयोग घेऊन आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असा सल्ला दिला. याशिवाय पोलिसांनी विशेष परिश्रम घेतल्याने कन्व्हेक्शनचा रेषो वाढविण्यात यश मिळाल्याचे सांगून 'लोकमत'च्या वृत्ताचाही उल्लेख केला.