पोलीस तपासात बालरोगतज्ज्ञाची मदत घेणार

By Admin | Updated: June 8, 2017 00:07 IST2017-06-08T00:07:51+5:302017-06-08T00:07:51+5:30

डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात झालेल्या चार नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणात तपासाला गती मिळण्यासाठी बालरोग तज्ज्ञाची मदत घेतली जाणार आहे.

In the police investigation, the pediatrician will help | पोलीस तपासात बालरोगतज्ज्ञाची मदत घेणार

पोलीस तपासात बालरोगतज्ज्ञाची मदत घेणार

पीडीएमसीतील चार नवजात शिशुंचे मृत्यू प्रकरण : जिल्हा शल्यचिकीत्सकांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात झालेल्या चार नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणात तपासाला गती मिळण्यासाठी बालरोग तज्ज्ञाची मदत घेतली जाणार आहे. यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक अरुण राऊत यांना पत्र पाठविले आहे.
पीडीएमसीतील नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणात व्हिसेरा अहवाल अद्यापपर्यंत पोलिसांना प्राप्त झाला नाही. व्हिसेरा अहवालातून त्या तीनही शिशुंच्या मृत्युचे निश्चीत कारण समोर येणार आहे. याप्रकरणात गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर चौकशी करीत आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील या गुन्हेविषयक प्रकरणाच्या तपासाकार्यात बाधा निर्माण होऊ नये, या जटील प्रकरणात तपासात अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञ डॉक्टराची तपास कार्यात मदत व्हावी, या दृष्टीने पोलिसांना बालरोग तज्ज्ञांची गरज आहे. या घटनेच्या अनुषंगाने सीएस अरुण राऊत यांच्या डॉक्टरांच्या चमुने एनआयसीयुची तपासणी करून अहवाल तयार केला. त्यात त्यांना एनआयसीयुत अनेक त्र्युटा आढळून आल्या आहेत.

नायब तहसिलदारांचे पोलिसांना पत्र
चांदुरबाजार येथील आफरीन बानो यांच्या मृत शिशुचे शवविच्छेदन करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र, चांदुरबाजारातील कब्रस्थानात आफरीन यांच्या शिशुचा मृतदेह कोणत्या ठिकाणी दफन केला आहे. ही बाब जाणून घेण्यास मृत शिशुचे पालक उपस्थित असणे गरजेचे आहे. आफरीन बानो व त्यांचे पती हे मध्यप्रदेशात गेले असून त्यांच्याशी नायब तहसीलदार व पोलिसांचा संपर्क अद्यापपर्यंत झाला नाही. त्यामुळे त्यांच्या परवानगी व उपस्थितीशिवाय शिशुचे शवविच्छेदन होणार कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात नायब तहसिलदारांनी गाडगेनगर पोलिसांना पत्र पाठवून कळविले आहे.

डॉ. राजेंद्र निस्तानेची चौकशी होणार
पीडीएमसीच्या बालरोग विभागाचे प्रमुख बालरोग तज्ज्ञ राजेंद्र निस्ताने यांच्याकडे एनआयसीयुची जबाबदारी होती. घटनेच्या दिवशी निस्ताने यांची ड्युटी सुध्दा होती. मात्र, ते उपस्थित नव्हते. उलट त्यांनी अनधिकृतपणे रजा घेतल्याचे पीडीएमसी प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले. याप्रकरणाशी त्यांचा थेट संबंध नसला तरी, ते घटनेची माहिती मिळाल्यावर का आले नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात पोलीस विभागाकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. पोलिसांकडून निस्ताने यांना बोलाविण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली आहे. चौकशीअंती कारवाईची दिशा ठरेल, असे मंडलिक म्हणाले.

दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज सादर : तीन नवजात शिशुंच्या मृत्युप्रकरणातील आरोपी डॉ. कट्टा व परिचारिका विद्या थोरात यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. त्यांनी वकीलमार्फत न्यायालयात जामीन अर्ज सादर केला आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी ८ जून रोजी "से" दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुंडकर यांनी दिली.

Web Title: In the police investigation, the pediatrician will help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.