पोलिसांचे मार्गदर्शन सुरू

By Admin | Updated: September 25, 2015 01:02 IST2015-09-25T01:02:20+5:302015-09-25T01:02:20+5:30

मागील दोन दिवसांपासून ‘ऐलान’ करण्याचा शिरस्ता सुरुच आहे. मुस्लिम धर्मांमध्ये बकरी ईदला महत्व असून पूर्वजांच्या आठवणींना उजाळा दिला जातो.

Police guidance continues | पोलिसांचे मार्गदर्शन सुरू

पोलिसांचे मार्गदर्शन सुरू

अमरावती : मागील दोन दिवसांपासून ‘ऐलान’ करण्याचा शिरस्ता सुरुच आहे. मुस्लिम धर्मांमध्ये बकरी ईदला महत्व असून पूर्वजांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. कुटुंबांतील मृत व्यक्तिंच्या नावे बकरी ईदनिमित्त ‘कुर्बानी’ दिली जाते. ही परंपरा मुस्लिम धर्मांत वर्षांनुवर्षापासून सुरु आहे. मात्र गोवंश हत्याबंदीमुळे बैल, वळू, गाय यांची हत्या करता येत नाही. तर दुसरीकडे पोलिसांनी बकरी ईदमध्ये कोणीही गोवंश हत्या करु नये, यासाठी उपाययोजना चालविला आहेत. मुुस्लिम समाजातील प्रतिष्ठीत नागरिक, लोकप्रतिनिधींची बैठक घेवून गोवंश हत्याबंदीचे उल्लघंन होणार नाही, ही काळजी घेतली जात आहे. बकरी ईदनिमित्त गोवंश ऐवजी बोकड, शेळी, मेंढी या प्राण्यांची कत्तल केल्यास धार्मिक परंपरा जपून अन्य धर्मियांच्या भावनांना ठेच पोहचणार नाही, ही जनजागृती पोलीस प्रशासन मुस्लिम समाजात करीत आहेत. बकरी ईदमध्ये ‘कुर्बानी’वरुन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी मुस्लिम समाजाने यंदा गोवंश हत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने समाजात जनजागृती व्हावी, यासाठी मशिदीतून ‘ऐलान’ केले जात आहे. ही जबाबदारी मौलवींवर सोपविण्यात आली आहे. तसेच एकमेकांना भेटताना मुस्लिम बांधव गोवंशाची हत्या करु नये, असे आवर्जून सांगत आहेत.

Web Title: Police guidance continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.