२२ जणांच्या डीएनए चाचणीतून पोलिसांनी शोधला ‘कुंवारा बाप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:11+5:302021-08-15T04:16:11+5:30
पथ्रोट : तब्बल २२ जणांची डीएनए चाचणी करून पथ्रोट पोलिसांनी मतिमंद मुलीने जन्मास घातलेल्या मुलाचा पिता शोधून काढला आहे. ...

२२ जणांच्या डीएनए चाचणीतून पोलिसांनी शोधला ‘कुंवारा बाप’
पथ्रोट : तब्बल २२ जणांची डीएनए चाचणी करून पथ्रोट पोलिसांनी मतिमंद मुलीने जन्मास घातलेल्या मुलाचा पिता शोधून काढला आहे. दोन वर्षानंतर या घटनेचा उलगडा झाला.
स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक मतिमंद मुलगी दुष्कृत्यातून गर्भार राहिली. सन २०१८ मध्ये तिने बाळाला जन्म दिला होता. १ जून २०१९ ला पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून पथ्रोट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, आरोपीचा मागमूस लागलेला नव्हता.
पथ्रोट पोलिसांनी संशयाच्या आधारे तब्बल २२ जणांना ताब्यात घेत डीएनए तपासणी केली. वैद्यकीय प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार प्रज्ज्वल हरिदास मोरे (२०, रा. रासेगाव) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पीडितेच्या आईने याआधी दिलेल्या फिर्यादीवरून पथ्रोट पोलिसांनी शनिवारी प्रज्ज्वल मोरेज्भादंविचे कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
ठाणेदार सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार हेमंत येरखडे, नरेश धाकडे, सुनील पवार यांनी सातत्याने तपास सुरू ठेवून तीन वर्षानंतर आरोपीचा छडा लावून त्याला जेरबंद केले, हे विशेष.
‘ते‘ बाळ दत्तक?
मतिमंद मुलीशी केलेल्या कूकर्मातून जन्माला आलेले ते बाळ अमरावती येथील एका समाजसेवी संस्थेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दत्तक देण्यात आल्याची माहिती आहे.
कोट
१ जून २०१९ रोजी तक्रार दाखल करवून घेण्यात आली होती. मात्र, आरोपी निष्पन्न होत नव्हता. त्यामुळे संशयित २२ जणांची डीएनए चाचणी करण्यात आली. पैकी एका २० वर्षीय आरोपीचा डीएनए त्या बाळाच्या डीएनएशी जुळला. वैद्यकीय अहवालानुसार, त्या तरुणाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून शनिवारी त्याला अटक केली.
- सचिन जाधव, ठाणेदार
पथ्रोट