पोलिसांचा संपला वचक
By Admin | Updated: May 27, 2015 00:25 IST2015-05-27T00:25:39+5:302015-05-27T00:25:39+5:30
राजापेठ पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच मंगळवारी सकाळी दोन युवकांमध्ये हाणामारी झाल्याने खळबळ उडाली....

पोलिसांचा संपला वचक
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच मंगळवारी सकाळी दोन युवकांमध्ये हाणामारी झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांच्या नजरेसमोरच लाठ्याकाठ्या व लोंखडी पाईपने दोन जण एकमेकांवर हल्ला करीत होते. त्यामुळे पोलिसांचा वचक कमी झाल्याचे चित्र राजापेठ ठाण्यात दिसून आले. रामचंद्र रामकिशोर यादव (४५) व प्रतीक रामराव यादव (२५, रा. दोन्ही राहणार तारासाहेब बगिचा) अशी जखमींची नावे आहेत.
पोलीस सूत्रानुसार नीरज यादव व प्रतीक यादव यांचा बल्लू ऊर्फ रामचंद्र यादव याच्यांशी वाद झाला. त्यांच्यातील वाद उफाळून आल्यावर राजापेठ पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर त्यांच्यात धुमश्चक्री सुरु झाली.
दोन युवक हातात लाठी काठी व लोंखडी पाईपने एकमेकांवर हल्ला करीत असल्याचे राजापेठ पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी लगेच धाव घेऊन दोघांनाही आवरले. मात्र, या हाणामारीत प्रतीक यादव रामचंद्र यादव जखमी झाले.