अमरावती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी माेर्शी येथे मस्त्य विज्ञान महाविद्यालयाच्या पायाभरणी कार्यक्रमाला येत आहे. या त्यांच्या मोर्शी दौऱ्यानिमित शेतकरी कर्जमाफीची तारीख घोषित करण्याची मागणी करणाऱ्या आणि तसे बॅनर लावणाऱ्या प्रहारच्या वरूड तालुका संपर्क प्रमुख अजय चौधरी यांच्यासह, तालुका प्रमुख प्रणव कडू, विलास पांडगडे, लिलाधर काकडे, अजय बहुरूपी यंच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते वरूड पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी यासह अन्य न्यायीक मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांची शोधमाेहिम चालविली असून त्यांना पोलिस नजरकैदेत ठेवण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:03 IST