पाच हजारांची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST2021-03-10T04:15:20+5:302021-03-10T04:15:20+5:30
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : चोरीच्या दाखल गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना पोलीस शिपायासह पोलीस पाटील इसमास रंगेहाथ ...

पाच हजारांची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : चोरीच्या दाखल गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना पोलीस शिपायासह पोलीस पाटील इसमास रंगेहाथ अटक करण्यात आली. तालुक्यातील येणस येथे ९ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पोलीस शिपाई प्रवीण ज्योतिदास तायडे (४५, नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत) व येवतीचा पोलीस पाटील केशव परशराम मेश्राम (४९) असे अटक आरोपींची नावेआहेत.
तक्रारदाराच्या वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचेसुद्धा नाव असल्याचे सांगून दाखल गुन्हातून नाव काढण्यासाठी दोन्ही आरोपींनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. सापळा कारवाईदरम्यान पोलीस शिपायाने पाच हजार रुपये लाच घेतली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.