रोडरोमिओविरूद्ध पोलिसांनी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:34 IST2018-03-20T00:34:41+5:302018-03-20T00:34:41+5:30

शहरात रोडरोमिओंचा उच्छाद थांबविण्यासाठी दामिनी पथक कार्यान्वित करण्याचा अचलपूर पोलिसांनी निर्णय घेतला. या मुद्द्यावर सामाजिक संघटनाही सरसावल्या असून, योग्य पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘लोकमत’ने हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता.

Police against the Roadromiyo | रोडरोमिओविरूद्ध पोलिसांनी कसली कंबर

रोडरोमिओविरूद्ध पोलिसांनी कसली कंबर

ठळक मुद्देदामिनी पथकाची निर्मिती : सामाजिक संघटनाही सरसावल्या

आॅनलाईन लोकमत
अचलपूर : शहरात रोडरोमिओंचा उच्छाद थांबविण्यासाठी दामिनी पथक कार्यान्वित करण्याचा अचलपूर पोलिसांनी निर्णय घेतला. या मुद्द्यावर सामाजिक संघटनाही सरसावल्या असून, योग्य पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘लोकमत’ने हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता.
‘अचलपूर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट’ या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अचलपूर, परतवाडा पोलीस खडबडून जागे झाले. सध्या परीक्षेचा काळ आहे. यादरम्यान परीक्षा केंद्रावर अचलपूर, परतवाडा परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट झालेला होता. रस्त्यावर तसेच आॅटोरिक्षा, एसटी बस थांब्यावर विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अचलपूर, परतवाडा पोलिसांनी रोडरोमिओ, चिडीमारांविरूद्ध कडक कारवाई करण्याकरिता ‘दामिनी पथक’ची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक महिला व एक पुरुष पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सकाळच्या वेळेस शिकवणी वर्गाला जाणाऱ्या विद्यार्थिनींना दामिनी पथक मदत करणार आहे.
विद्यार्थिनींनी कोणताही दबावाला बळी न पडता छेडखानी झाल्यास त्वरीत पोलिसांना सूचना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.
हेल्पलाईनची बैठक
यासंदर्भात हेल्पलाइनसुद्धा सक्रिय झाली आहे. सदस्यांची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे सांगितले.

Web Title: Police against the Roadromiyo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.