वनजमिनींवर पोकलँडने खोदकाम

By Admin | Updated: October 26, 2016 00:17 IST2016-10-26T00:17:39+5:302016-10-26T00:17:39+5:30

वनजमिनीवर यंत्र अथवा मशीनद्वारे खोदकाम करता येत नसताना खासगी कंपनीच्यावतीने वनजमिनींवर ...

Poklland digging on forests | वनजमिनींवर पोकलँडने खोदकाम

वनजमिनींवर पोकलँडने खोदकाम

मशीन जप्त : सालोड-कारंजा मार्गावर भूमिगत केबलची कामे
अमरावती : वनजमिनीवर यंत्र अथवा मशीनद्वारे खोदकाम करता येत नसताना खासगी कंपनीच्यावतीने वनजमिनींवर पोकलँडने भूमिगत आॅप्टिकल फायबर केबलची कामे युद्धस्तरावर केली जात आहेत. याप्रकरणी वनविभागाने खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध वनगुन्हे नोंदवून पोकलँड ताब्यात घेतला.
सालोड ते कारंजा मार्गावर भूमिगत आॅप्टिकल फायबर केबलची कामे सुरू आहेत. खासगी, शासकीय जमिनींवरदेखील केबल टाकले जात आहेत. मात्र कंत्राटदाराने वनजमिनीवर खोदकाम करण्याचा प्रताप केला आहे. सालोड हे क्षेत्र बडनेरा वर्तुळात गणले जात असून सुमारे तीन किमी अंतरापर्यंत वनजमिनीवर अवैध उत्खनन करण्यात आले आहे. मंगरुळ चव्हाळा बीटमध्ये सदर खोदकाम येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बडनेराच्या वनपाल वर्षा हरणे यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने हाताळले असून वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात नागपूर येथील कंत्राटदार योगेंद्र हिरालाल यादव यांच्याविरुद्ध वनगुन्हे दाखल करून पोकलँड ताब्यात घेतला आहे. सदर खोदकाम करण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदाराला मिळालीे आहे. रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अंतरावर केबल टाकण्याची परवानगी असल्याची माहिती आहे. मात्र सालोड ते कारंजा मार्गावर वनजमिनीवर ५९१ रनिंग मीटर अवैध खोदकाम करण्यात आले आहे. यात काही झाडे, झुडपांची हानीदेखील झाली आहे. परिणामी या प्रकरणी वनविभागाने गुन्हे दाखल केले आहे. वनजमिनीवर पोकलँडने खोदकाम केल्याप्रकरणी ते जप्त करण्यात आले आहे. पोकलँड जप्त केल्याप्रकरणीे वनविभागाने ही माहिती न्यायालयाकडे सादर केली आहे. सदर खोदकाम वनजमिन वगळता अन्य क्षेत्रात सुरु असल्याची माहिती आहे.

पोकलँड ताब्यात घेऊन चौकशी सुरु
बडनेरा वनवर्तुळांतर्गत येणाऱ्या सालोड ते कारंजा मार्गावरील वनजमिनीवर पोकलँडने खोदकाम केल्याप्रकरणी ते ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी आरंभली आहे. याप्रकरणाची सत्यता तपासून वनसंवर्धन कायदा १९८० तसेच भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (ड) व २६ (अ) नुसार पुढील कारवाई करण्याची तयारी वनविभागाने चालविली असल्याची माहिती आहे.

वनजमिनीवर खोदकाम केल्याप्रकरणी वनगुन्हे दाखल करुन पोकलँड ताब्यात घेतले आहे. सदर कंत्राटदाराकडे खोदकामाची परवानगी आहे. परंतु वनजमिनीवर खोदकाम प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
- हरिश्चंद्र पडगव्हाणकर
वनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी

Web Title: Poklland digging on forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.