घोटा गावातील तीन चिमुकल्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:31+5:30

घोटा गावातील रहिवासी किशोर बेठेकर यांची शेती गावातीलच गणपत खंडारे यांच्या शेताजवळ आहे. खंडारे यांच्याकडे म्हशी असल्याने किशोर बेठेकर हे त्यांच्याकडून दूध आणतात. सोमवारी सायंकाळी बेठेकर यांनी शेतातून येताना एक लिटर दूध आणले. ते दूध रात्री गरम करून ठेवले. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांचे गणेश (३ वर्षे), कृती बेठेकर (५ वर्षे) व करिना (२ वर्षे) या चिमुकल्यांनी दूध प्राशन केले.

Poisoning of three Chimukals in Ghota village | घोटा गावातील तीन चिमुकल्यांना विषबाधा

घोटा गावातील तीन चिमुकल्यांना विषबाधा

Next
ठळक मुद्देकारण अस्पष्ट : उपजिल्हा रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यातील घोटा गावातील तीन चिमुकल्यांना मंगळवारी सकाळी विषबाधा झाल्याने त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नालट यांनी स्पष्ट केले.
घोटा गावातील रहिवासी किशोर बेठेकर यांची शेती गावातीलच गणपत खंडारे यांच्या शेताजवळ आहे. खंडारे यांच्याकडे म्हशी असल्याने किशोर बेठेकर हे त्यांच्याकडून दूध आणतात. सोमवारी सायंकाळी बेठेकर यांनी शेतातून येताना एक लिटर दूध आणले. ते दूध रात्री गरम करून ठेवले. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांचे गणेश (३ वर्षे), कृती बेठेकर (५ वर्षे) व करिना (२ वर्षे) या चिमुकल्यांनी दूध प्राशन केले. त्यासोबतच घरात असलेले रात्रीचे शिळे अन्न जेवले. सकाळी ११ च्या सुमारास त्या तिन्ही चिमुकल्यांना अचानक वांत्या होण्यास सुरुवात झाली. किशोर बेठेकर यांनी त्यांना दुचाकीने तात्काळ उतावली येथील महात्मा गांधी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर तेथील रुग्णवाहिका देऊन धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
तिन्ही बालकांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिळे अन्न व दूध हा अन्नाचाच प्रकार आहे. चिमुकल्यांवरील उपचारादरम्यान त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
- डॉ. अमोल नालट
वैद्यकीय अधीक्षक, धारणी

Web Title: Poisoning of three Chimukals in Ghota village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.