सहा महिन्यांपूर्वी केले विष प्राशन, आता झाली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST2021-06-28T04:10:50+5:302021-06-28T04:10:50+5:30

अमरावती : तापट स्वभावाच्या एका अल्पवयीन मुलीने सहा महिन्यांपूर्वी विष प्राशन केले होते. आता ती घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद ...

Poisoning done six months ago, has now disappeared | सहा महिन्यांपूर्वी केले विष प्राशन, आता झाली बेपत्ता

सहा महिन्यांपूर्वी केले विष प्राशन, आता झाली बेपत्ता

अमरावती : तापट स्वभावाच्या एका अल्पवयीन मुलीने सहा महिन्यांपूर्वी विष प्राशन केले होते. आता ती घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद पित्याकडून फ्रेजरपुरा ठाण्यात शनिवारी रात्री दाखल करण्यात आली.

पोलीस सूत्रांनुसार, फिर्यादी पित्याने दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीसोबत तिच्या सावत्र आईचे चांगले संबंध आहेत. मात्र, मुळातच तापट स्वभाव असलेली मुलगी जिवाचे बरे-वाईट करण्यास मागेपुढे पाहत नाही. यातूनच तिने सहा महिन्यांपूर्वी विष प्राशन केले होते. २६ जून रोजी

ती घरातून आढळली नाही. यासंदर्भात तिच्या वडिलांनी मैत्रिणींकडे चौकशी केली असता, एकीने दुचाकीचे पेट्रोल संपल्याने तिला पंपावर सोडल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर ती घरीच परतली नसल्याचे पित्याने फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदविला.

Web Title: Poisoning done six months ago, has now disappeared