विषबाधा झालेल्या मोराला तिवशात जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 00:21 IST2016-07-19T00:21:21+5:302016-07-19T00:21:21+5:30

तालुक्यातील वन शेतशिवारात विषबाधा झालेल्या एका राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला...

The poisoned morato survives | विषबाधा झालेल्या मोराला तिवशात जीवदान

विषबाधा झालेल्या मोराला तिवशात जीवदान

डॉक्टरांचे प्रयत्न : शेतकरी व वनरक्षकांची महत्त्वाची भूमिका
तिवसा : तालुक्यातील वन शेतशिवारात विषबाधा झालेल्या एका राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला काही सतर्क सामाजिक कार्यकर्त्यांच्या व डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर जीवदान मिळाले. रविवारी सकाळी माणुसकीचा प्रत्यय देणारी घटना तिवस्यात घडली.
विषबाधा होऊन वणी नजीकच्या एका शेतशिवारात एक नर जातीचा मोर तडफडत असल्याचे विनोद कडगे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ट्रॅक्टरचालक लुकेश अग्रवाल यांना सोबत घेऊन तिवसा पशुवैद्यकीय दवाखाना गठला. विषबाधा झालेल्या मोराला वाचविण्यात यश आल्याची तिवस्यात ही पहिलीच घटना असली तरी प्रत्येक नागरिकांचे प्राणिमात्रावर दया करणे हे आद्य कर्तव्य आहे.
एकीकडे विषबाधा झालेला मोर मरणासन्न अवस्थेत तर दुसरीकडे ज्याठिकाणी मोराला उपचाराकरिता आणले तो पशुवैद्यकीय दवाखाना तर वनविभागाचे कार्यालयही बंद अशी परिस्थिती ऐन मोराला वाचविण्याचा धडपडीत निर्माण झाली होती. विषबाधा झालेल्या मोरासाठी जरी हा शासकीय सुटीचा दिवस असला तरी प्रामाणिकपणे निवासी राहून कर्तव्य बजावणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांसाठी हा दिवस प्राध्यानाने मोराचा जीव वाचविण्यासाीच होता आणि सुदैवाने असेच घडले. त्याचे प्राण वाचविण्यासाठी सारेच एकवटले. रविवार सुटीचा दिवस इतरत्र घालविण्याच्या बेतात असलेल्या डॉक्टर, वन कर्मचारी व इतर सर्व जणांना जेव्हा मोराचे प्राण वाचविण्याबाबतचा निरोप भेटला तेव्हा आहे त्याच ठिकाणाहून डॉक्टर, वनरक्षक वनविभागाचे कार्यालयात दाखल झाले. अन एकच धावपळ निर्माण झाली. तिवसा दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज आडे, खाजगी डॉ.संजय गोंडसे यांनी शर्थीचे प्रयत्न करुन या मोराचे प्राण वाचविले.
हे प्राण वाचविण्यासाठी प्रामुख्याने हेमंत निखाडे, ग्रमीण रुग्णालयाच्या डॉ.हर्षा अलोने, वनरक्षक गजानन चव्हाण, दिलीप शापामोहन, विजय रेवतकर, अशोक दाहाट, वनमजूर मोहन वनवे, वैकुंठ वनवे, नितीन गोहत्रे, आदीनी आपापले सर्व कामे ठप्प ठेवून एक सामाजिक बांधिलकी जपून व मानवतेचा परिचय देत या मोराचे प्राण वाचविण्यासाठी धडपड केली. आवश्यक ते उपचार मोरापर्यत पोहचविण्यासाठी सर्वानी धावपळ केली. अखेर चार तासानंतर मोराच्या जीवात जीव आला व तो हालचाल करायला लागला, चालायला लागला, रविवरी दिवसभर हा मोर उपचारानंतर वनविभागाच्या स्वाधीन होता. (प्रतिनिधी)

चार तासांनंतर
वाचले मोराचे प्राण
मोराचे प्राण वाचविण्यासाठी सुदैवाने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.आडे व डॉ.गोंडसे यांनी शर्थीचे उपचार केले. त्याला पाहिजे ते औषध व डॉक्टर उपलब्ध झाले. त्याला दर १५ मिनिटांनी ३ इंजेक्शन, २ सलाईनचा डोज पोहचल्यानंतर त्याचे विषमय शरीर धोक्याबाहेर पडले आणि मोर चार तासानंतर चक्क चालायला लागला.

Web Title: The poisoned morato survives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.