पोदारची मृणाल ‘लोकमत’ हवाई सफरची मानकरी

By Admin | Updated: June 23, 2015 01:00 IST2015-06-23T01:00:30+5:302015-06-23T01:00:30+5:30

‘लोकमत’वृत्तपत्र समूहाद्वारे गतवर्षी घेण्यात आलेल्या ‘संस्कारांचे मोती’ या स्पर्धेत सहभागी झालेली..

Podar's Mrinal 'Lokmat' air travel advice | पोदारची मृणाल ‘लोकमत’ हवाई सफरची मानकरी

पोदारची मृणाल ‘लोकमत’ हवाई सफरची मानकरी

संस्कारांचे मोती : २५ ला मुंबई-दिल्ली-मुंबई उड्डाण
अमरावती : ‘लोकमत’वृत्तपत्र समूहाद्वारे गतवर्षी घेण्यात आलेल्या ‘संस्कारांचे मोती’ या स्पर्धेत सहभागी झालेली स्थानिक पोदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी मृणाल राजेश देशमुख ही अमरावती जिल्ह्यातून ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ या हवाई सफरीची भाग्यवान विजेती ठरली आहे.
सर्व विजयी स्पर्धक २५ जून रोजी नागपूर येथून हवाई उड्डाण करणार आहेत. ‘लोकमत’संस्कारांचे मोती ग्रीन कीड्स ही स्पर्धा १ जुलै ते ११ आॅक्टोबर-२०१४ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इतर बक्षिसांशिवाय चिमुकल्या विद्यार्थ्यांना ‘हवाई सफरी’ची संधी दिली जाणार होती. यात पोद्दार इंटरनॅशनल शाळेची इयत्ता सातवीची मृणाल देशमुख ही भाग्यवान विजेती ठरली. या हवाई सफरदरम्यान मृणाल दिल्ली येथे राष्ट्रपती भवनालाही भेट देणार आहे. या निवडीबद्दल मुख्याध्यापक सुधीर महाजन व शिक्षकांनी मृणालचे कौतुक केले आहे.

Web Title: Podar's Mrinal 'Lokmat' air travel advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.